जाहिरात
Story ProgressBack

गुगल मॅप, डोक्याला ताप! पर्यटकांची सुसाट कार थेट तलावात शिरली, अन्...

कोट्टायम जिल्ह्यातील कुरुप्पनथारामध्ये रस्ता चुकल्याने आणि पावसामुळे नीट दिसत नसल्याने पर्यटकांचे वाहन तलावात शिरलं. सुदैवाने जवळच पोलीस आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

Read Time: 2 mins
गुगल मॅप, डोक्याला ताप! पर्यटकांची सुसाट कार थेट तलावात शिरली, अन्...

हैदराबादमध्ये आलेल्या केरळच्या प्रवाशांना गुगल मॅपचा वापर करणे चांगलंच महागात पडलं आहे. गुगल मॅपच्या साहाय्याने रस्ता शोधत हे पर्यटक आपल्या कारने अलप्पुझा स्थळी निघाले होते. मात्र रस्ता चुकल्याने या प्रवाशांची कार थेट तलावात शिरली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील कुरुप्पनथारा येथे ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली, त्यावेळी कारमध्ये एका महिलेसह चार जण होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मार्गावरुन हे प्रवाशी प्रवास करत होते तिथे जोरदार पाऊस सुरु होता. मुसळधार पावसामुळे दृष्यमानता कमी असल्याने प्रवाशांना रस्त्याचा अंदाज येत नव्हता. पर्यटक या परिसरात नवीन असल्याने येथील रस्त्यांची माहिती नसल्याने ते Google Map चा वापर करत होते.

(नक्की वाचा- Video : भर रस्त्यात गोळीबार आणि मारामारी, 2 गटांमधील गँगवॉर पाहून बसेल धक्का)

कोट्टायम जिल्ह्यातील कुरुप्पनथारामध्ये रस्ता चुकल्याने आणि पावसामुळे नीट दिसत नसल्याने पर्यटकांचे वाहन तलावात शिरलं. सुदैवाने जवळच पोलीस आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.  पोलीस आणि स्थानिकांनी या पर्यटकांना शर्थीचे प्रयत्न करत बाहेर काढलं.

पोलीस आणि नागरिकांनी चारही पर्यटकांना सुखरूप वाचवलं. मात्र त्यांची कार पूर्णत: पाण्यात बुडाली. कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं पोलिसांना सांगितलं. 

( नक्की वाचा : नातवाला वाचवायला आजोबांनी केला होता प्लॅन, पुणे पोलिसांचा गौप्यस्फोट )

केरळमधील अशाप्रकारची ही पहिली घटना नाही. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये दोन तरुण डॉक्टरांचा अशाच एका अपघातात मृत्यू झाला होता. प्रवासादरम्यान त्यांनी देखील गुगल मॅपची मदत घेतली होती. दरम्यान त्यांची कार एक नदीत शिरली, आता त्यांचा मृत्यू झाला होता.  

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
23 जुलै रोजी सादर होणार केंद्राचा अर्थसंकल्प, 22 तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होणार
गुगल मॅप, डोक्याला ताप! पर्यटकांची सुसाट कार थेट तलावात शिरली, अन्...
Rahul Gandhi should become leader of opposition demand in CWC meeting
Next Article
राहुल गांधींनी विरोधी पक्षेनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी, काँग्रेस कार्यकारिणीत नेत्यांचा सूर
;