मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर मंगळवारी निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. तपास यंत्रणा ईडीने केलेली अटक योग्य असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जिथे दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. केजरीवाल यांचे वकील आज सकाळी न्यायालयात हजर राहून या खटल्याच्या सुनावणीची मागणी करणार आहेत. उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने आप पक्षाने मंगळवारी सांगितले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडी केलेल्या अटकेविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात जाणार.
'आप'ने असा ही दावा केला आहे की, मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी चौकशी केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला संपवण्याचा सर्वात मोठा राजकीय कट आहे." उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच आपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने जसा दिलासा पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना दिला होता तसाच अरविंद केजरीवाल यांना ही दिला जाईल.