जाहिरात

Corona News: देशभरात कोव्हिडचे एकूण 257 रुग्ण, महाराष्ट्रात किती जणांना लागण?

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये नव्या कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

Corona News: देशभरात कोव्हिडचे एकूण 257 रुग्ण, महाराष्ट्रात किती जणांना लागण?
मुंबई:

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. भारतात ही कोरोनाचे रुग्ण अनेक राज्यात आढळले आहे. भारतात आतापर्यंत जवळपास 257 कोरोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण हे केरळमध्ये आढळले आहेत. त्या पाठोपाठ तामिळनाडू आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देशात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सध्याच्या स्थितीत जवळपास 257 रुग्ण भारतात आहेत. त्यात केरळमध्ये सर्वाधिक 95 रुग्ण आढळले आहेत. त्या पाठोपाठ तामिळनाडू मध्ये 66 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात आतापर्यंत 56 रुग्णांची नोंद झाली आहे. या शिवाय दिल्ली 5,राजस्थान 2, गुजरात 7, कर्नाटक 13, पुद्दूचेरी  10, पश्चिम बंगाल 1, सिक्कीम 1 आणि  हरियाणात 1 रुग्ण आढळून आला आहे. कोरोनाचा वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने खबरदारीचे उपाय योजले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Pakistan Spy: ज्योती मल्होत्रा, 12 गुप्तहेर अन् 12 प्रश्न, पाकिस्तानने नेमकं कुणाला हेरलं?

 दरम्यान  मुंबईत आतापर्यंत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.  पुण्यातही कोरोनाचे रुग्ण (Corona virus) आढळल्याचे समोर आले होते. अशा स्थिती राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कुणीही घाबरून जावू नये असे आवाहन केले आहे. रुग्ण वाढत असले तरी त्याची चिंता करण्याची  गरज नाही. कुणीही घाबरून जावू नये असं ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - पाकिस्तानच्या गुप्तहेरांचे धक्कादायक जबाब, 'असे' अडकले दानिशच्या जाळ्यात

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये नव्या कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नव्या कोरोना व्हेरिएंटच्या लक्षणांमध्ये  ताप, खोकला ही लक्षणे दिसून येतात. शिवाय घसा खवखवणे, दुखणे याचा ही त्रास होतो. थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखीचा ही त्रास यात होताना दिसून आला आहे. सर्दी, नाक वाहणे, चव, वास घेण्याची क्षमता कमी होणे ही पूर्वीची लक्षणेही दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com