मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना दादर पोलिसांकडून नोटीस देण्यात आलं आहे. दादर इथला कबुतरखाना कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे तसेच दादर कबुतरखाना इथे आंदोलन करून न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीला घेऊन मराठी एकीकरण समितीच्या वतीने पोलिसांना निवेदन दिले जाणार आहे. तसेच या मागणीला घेऊन मराठीकरण समितीचे कार्यकर्ते आज सकाळी दादर कबुतराखाना येथे जमणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान दादर कबुतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावाणी आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर जैन धर्मियांची आज बैठक घेण्यात येणार आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
Live Update : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, खड्ड्यांवरुन ठाकरे गट संतप्त
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने येथे वाहतूक ठप्प झाली आहे,
महामार्गावरील खड्ड्यांवरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाने आंदोलन पुकारलं आहे
Live Update : शिरूरमध्ये महसूल विभागाची कारवाई; 14 बोटी उद्ध्वस्त
शिरूरमध्ये महसूल विभागाची कारवाई; 14 बोटी उद्ध्वस्त
शिरूर – अवैध वाळू उपसावर महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई करत 8 फायबर व 6 बोटी जप्त करून जिलेटिनच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्या. अचानक झालेल्या या मोहिमेमुळे वाळू माफियामध्ये खळबळ उडाली आहे.
Live Update : कबुतरखान्याचा वाद, जैन विरुद्ध मराठी संघटना आक्रमक, पाहा LIVE
Live Update : कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन मराठी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन मराठी संघटना कार्यकर्ते आक्रमक
कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन मराठी संघटना कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त
अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं...
न्यायालयीन प्रक्रिया आहे, धार्मिक रंग देऊ नये - कार्यकर्ते
Live Update : जोगेश्वरीतील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये काम बंद आंदोलन
जोगेश्वरीतील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारले काम बंद आंदोलन
जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांनी पुकारले काम बंद आंदोलन
चार महिन्यापासून पगार मिळत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे
सणासुदीचे दिवस असल्याने पगार मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव काम बंद आंदोलन करावे लागत असल्याची कामगारांची भावना
भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वात कामगारांचे काम बंद आंदोलन
Live Update : भुसावळ रेल्वे स्थानकावर मनमाड व सुरतकडे जाणाऱ्या गाड्या 2 तासांपासून रखडल्या
भुसावळ रेल्वे स्थानकावर मनमाड व सुरतकडे जाणाऱ्या गाड्या 2 तासांपासून रखडल्या
गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस
वास्को-द-गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस
छपरा सुरत ताप्ती गंगा एक्सप्रेस
भुसावळ नंदुरबार पॅसेंजर पुनर्निर्धारित
ह्या गाड्या केल्या दोन तासापासून भुसावळ रेल्वे स्थानकावर उभ्या
भुसावळ जळगाव महामार्गावरील रेल्वे पुलावर गर्डर टाकण्याच्या कामामुळे भुसावळ रेल्वे स्थानकावर या गाड्या थांबून ठेवण्यात आल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती
पुढील दोन ते तीन दिवस गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने दररोज दोन ते तीन तासाचा ब्लॉक घेतला जाणार असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती
भुसावळ कडून सुरत मनमाड व मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या विलंबाने धावणार असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता
गेल्या दोन तासापासून गाड्या रखडल्यामुळे मात्र चाकरमानी व प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप
Live Update : महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्री नितेश राणेंना बांधली राखी
महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्री नितेश राणेंना बांधली राखी.
काल मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मंत्रालयातील दालनात येऊन आदिती तटकरे यांनी केलं रक्षाबंधन.
Live Update : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण, उद्यापासून दर्शन पूर्ववत होणार
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवी दिल्ली येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञांचे पथकाने ही प्रक्रिया केली. सोमवारपासून संवर्धन प्रक्रियेसाठी अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद आहे. आज धार्मिक विधी पार पडाल्यानंतर उद्यापासून हे दर्शन पूर्ववत होणार आहे.
Live Update : माहिम शितलादेवी मंदिर येथे झाड पडल्याने टॅक्सीचे नुकसान, मोठी वाहतूक कोंडी
माहिम शितलादेवी मंदिर येथे झाड पडल्याने टॅक्सीचे नुकसान
मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
Live Update : छत्रपती संभाजीनगर शहर भोंगे मुक्त, विविध धार्मिक स्थळावरील 11 हजार 436 भोंगे उतरवले
छत्रपती संभाजीनगर शहर भोंगे मुक्त, विविध धार्मिक स्थळावरील 11 हजार 436 भोंगे उतरवले
छत्रपती संभाजीनगरमधे विविध धार्मिक स्थळावरील 11 हजार 436 भोंगे उतरविण्यात आले.
संभाजीनगरातील सर्वधर्मीय 1 हजार 906 धार्मिक स्थळे होती...
यापैकी 937 धार्मिक स्थळावरील साडेअकरा हजार भोंगे काढण्यात आली.
कुठलाही वाद विवाद न होता पोलिसांनी जनजागृती करीत शहरातील धार्मिकस्थळावरील भोंगे काढले....
Live Update : दक्षिण सोलापूर तालुक्यात मरणानंतरही मृतदेहाची स्मशानभूमी अभावी हेडसांड, भर पावसात अंत्यविधी
दक्षिण सोलापूर तालुक्यात मरणानंतरही मृतदेहाची स्मशानभूमी अभावी हेडसांड, भर पावसात अंत्यविधी
- बसवनगर तेरा मैल येथे स्मशानभूमी अभावी भर पावसात अंतिम संस्कार..
- दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसात चिखलातून वाट काढत स्मशानभूमीकडे जाण्याची ग्रामस्थांवर वेळ
- बसवनगर येथे स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर करावे लागतात अंतिम संस्कार
- बसवनगर येथे एका वयस्कर व्यक्तीचे अल्पशा आजाराने निधन झालं त्यांची अंतिम संस्कार करत असताना स्मशान भूमी अभावी रस्त्याच्या कडेला करावे लागले अंत्यसंस्कार.
- तालुका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप..
Live Update : एसटी महामंडळात वर्कशॉपमध्ये क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
एसटी महामंडळात वर्कशॉप मध्ये क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रितेश मोहिते असं कर्मचाऱ्यांचे नाव असून ते बीडच्या गेवराई आगारातील वर्कशॉप मध्ये कार्यरत होते. मात्र सतत वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी. या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी थेट मृतदेह गेवराई आगारात नेऊन ठेवला. पोलिसांच्या मध्यस्थीने कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मात्र दोशींवर कारवाईची मागणी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून केली जात आहे.
Live Update : भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली; नवे जिल्हाधिकारी म्हणून नमन गोयल यांची नियुक्ती....
भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची नियुक्ती झाली आहे. शासनाने त्यांना त्वरित कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत. गोयल हे एक आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी विविध प्रशासकीय पदांवर यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भंडारा जिल्ह्यात नव्या प्रशासकीय दृष्टीकोनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, डॉ. कोलते यांच्या पुढील नियुक्तीबाबत अद्याप स्पष्टता नाही.
Live Update : अकोल्यात रेशन कार्ड दुरुस्तीसाठी लागलेल्या रांगेत महिलांमध्ये वाद
अकोल्याच्या शहर पुरवठा विभागात रेशन कार्ड दुरुस्ती, नूतनीकरण आणि नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात रांगा लावाव्या लागत आहेत. मंगळवारी अशाच रांगेत दोन महिलांमध्ये वाद होऊन शाब्दिक खडजंगी झाली आणि एकमेकींवर हात उगारण्यात आले, ज्यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान यावेळी एका महिलेने मध्यस्थीमुळे वाद निवळला. दोन महिन्यांपासून नाव कमी करण्यासाठी अर्ज करणाऱ्या वृद्ध महिलेला अद्याप सेवा न मिळाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून वारंवार वाद निर्माण होत आहेत. याकडे पुरवठा निरीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
Live Update : अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, अपघातात चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू..
अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील हिंगोलीच्या दंत महाविद्यालयाजवळ आज सकाळी मालवाहतूक करणाऱ्या छोट्या पिकपचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातात चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू झालाय, समोर उभ्या असलेल्या अज्ञात वाहनाला धडक दिल्याने हा अपघात झाल्याच दिसून येत आहे.
Live Update : पंढरपूर कॉरिडॉरमधून होळकर वाडा आणि शिंदे सरकार वाडा वगळला...
पंढरपूरच्या बहुचर्चित कॉरिडॉर मधून होळकर वाडा आणि शिंदे सरकार वाडा आता वगळण्यात आला आहे. हेरिटेज वास्तू म्हणून शिंदे सरकार वाडा आणि होळकर वाडा हे बाधित होणार नाहीत. अशा वाड्यांचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे. शिवाय कॉरिडॉर मधील मंदिरे आणि समाधी यांचेही जतन आणि संवर्धन शासनामार्फत होणार आहे. अनेक हेरिटेज असणाऱ्या मठांच्या देखील संवर्धनाची भूमिका शासनाची असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले आहे. होळकर वडा आणि शिंदे सरकार वाडा याला दोनशे वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे ऐतिहासिक व हेरिटेज वास्तू म्हणून होळकर वाडा आणि शिंदे सरकार वाडा आता पंढरपुरात जपला जाणार आहेत.
Live Update : पंढरपुरातील मोठ्या घरफोडीचा पोलिसांनी लावला चतुराईने तपास
पंढरपुरामध्ये झालेल्या एका मोठ्या घरपोडीमध्ये तब्बल आठ लाख 81000 चे सोन्याचे दागिने आरोपीसह पोलिसांना मिळवण्यात मोठे यश मिळाले आहे. घरात चोरी झाल्यानंतर मास्क बांधून आलेल्या इसमाने चोरी केल्याचा दावा फिर्यादीने केला होता. मात्र प्रत्यक्षात घरातील केअरटेकर महिलेनेच घरातील सोन्याची चोरी केल्याचे पोलिसांनी तपासात उघड केले आहे. याबाबत पोलिसांनी आरोपी महिलेकडून आठ लाख 81000 चे सोने व काही चांदीची भांडी देखील हस्तगत केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे आणि पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या टीमने केली आहे.
Live Update : विविध राज्यातून चोरी गेलेले मोबाईल फोन जवाहरनगर पोलिसांनी जप्त करत मूळ मालकांना केले परत
छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलिसांनी CEIR पोर्टलच्या मदतीने बाहेरील राज्यांमधून आणि इतर जिल्ह्यातून चोरी गेलेले 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे 20 मोबाईल फोन शोधून काढत ते ताब्यात घेतले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत पाटील यांच्या हस्ते ते मोबाईल मूळ तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत. गेलेला मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहे.