जाहिरात

Delhi Bomb Blast: नोकरी, वाद आणि गायब… शाहिनाच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे

शाहिना ही कानपूरमधील जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक होती. मात्र 2013 मध्ये कोणतीही सूचना न देता तिने नोकरी सोडली.

Delhi Bomb Blast: नोकरी, वाद आणि गायब… शाहिनाच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे

Delhi Bomb Blast: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण कार स्फोटानंतर तपास यंत्रणांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. या कटामागचे मुख्य केंद्र फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठ असल्याचे उघड झाले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या बिल्डिंग क्रमांक 17 मधील रूम नंबर 13 मध्ये या हल्ल्याचा कट रचण्यात आला होता.

रूम नंबर 13 मधून मिळाले पुरावे

तपास यंत्रणांनी या खोलीतून कागदपत्रे, डिजिटल डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. या पुराव्यांमुळे दिल्ली स्फोटाचा कट इथेच रचल्याचा संशय अधिक बळकट झाला आहे. या कटात डॉ. शाहिनाची प्रमुख भूमिका असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

(नक्की वाचा-  Delhi Car Blast: वाहनांच्या गर्दीत अचानक स्फोट अन् आगीचा भडका; नेमकं काय घडलं, पाहा VIDEO)

नोकरी, वाद आणि गायब

शाहिना ही कानपूरमधील जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक होती. मात्र 2013 मध्ये कोणतीही सूचना न देता तिने नोकरी सोडली. त्यानंतर तिचे लग्न महाराष्ट्रातील जफर हयातशी झाले. पण 2015 मध्ये वादामुळे हे नाते तुटले. मेडिकल कॉलेजने तिची सेवा रद्द केल्यानंतर ती फरीदाबादला आली. तिथे तिची भेट डॉ. मुझम्मिलशी झाली आणि त्याच्या माध्यमातून ती अल फलाह विद्यापीठाशी जोडली गेली. यानंतर शाहिना या नेटवर्कच्या संपर्कात आली आणि कट्टरपंथी गटाशी तिचे संबंध दृढ झाले.

(नक्की वाचा- Delhi Red Fort Blast Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर पार्ट 2' ची तयारी? स्फोटानंतर दिल्लीत मोठ्या घडामोडी)

एनआयए आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी या विद्यापीठातील नेटवर्कवर लक्ष केंद्रित केले आहे. शाहिनासह इतर संशयितांविरुद्ध कठोर कारवाईची तयारी सुरू आहे. या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांचा दहशतवादी कटात वापर होण्याचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. दिल्ली स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, पुढील काही दिवसांत या कटाचा संपूर्ण उलगडा होण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com