पंजाबमधील मोहाली आणि चंदीगडमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित बड्या बिल्डरांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी मोहीम उघडली आहे. गुरुवारी सकाळी मोहालीतील खन्ना येथील एका गृहनिर्माण संस्थेत ईडीचे अधिकारी पोहोचले असता, तिथे उपस्थित असलेल्यांना चक्क आकाशातून नोटांचे बंडल पडताना दिसले.
नक्की काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक व्यावसायिक नितीन गोहिल यांच्या नवव्या मजल्यावरील फ्लॅटवर छापा टाकण्यासाठी इमारतीत शिरले. अधिकारी दारात पोहोचताच, घरातील व्यक्तीने 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलने भरलेल्या दोन पिशव्या बाल्कनीतून खाली फेकल्या. सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांना मैदानात नोटांचे बंडल विखुरलेले दिसले.
ED Raid in Mohali Free Cash Distribution by AAP! 😂😂😂
— Crish Bhatia 🇮🇳 (@bhatiacrish___) May 7, 2026
CM Mann's close aide OSD Rajbir Ghumman's relatives throwing crores of 500 notes from 9th floor. Kejriwal's training of Kattar Imaandar finally paying off in Punjab.
pic.twitter.com/Vo4OBB7BYq
(नक्की वाचा- Pandharpur-Tirupati Train: विठूरायाची पंढरी तिरुपतीशी जोडली! 16 मेपासून नियमित रेल्वे धावणार, वाचा टाईमटेबल)
21 लाख रुपये जप्त
ईडीने जमिनीवर पडलेली एक पिशवी ताब्यात घेतली असून, त्यातून सुमारे 21 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. एका व्यक्तीने दुसरी पिशवी घेऊन कारमधून पळ काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात मैदानावर विखुरलेल्या नोटा स्पष्ट दिसत आहेत.
रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ
ईडीने चंदीगड आणि मोहालीतील एकूण 12 ठिकाणांवर कडक बंदोबस्तात छापेमारी केली. पंजाबमधील प्रभावशाली बिल्डर आणि काही बड्या व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयांवर एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली.
(नक्की वाचा- Ashok Kharat: भोंदू खरातचं बँक लॉकर पाहून ईडीचे अधिकारीही थक्क! काय-काय सापडलं?)
कारवाईचे कारण काय?
हा संपूर्ण तपास 'ग्रेटर मोहाली एरिया डेव्हलपमेंट ऑथोरिटी' (GMADA) कडून दिल्या जाणाऱ्या 'जमीन वापर बदलाच्या' (CLU) परवान्यांशी संबंधित आहे. मोठ्या प्रमाणाdवर आर्थिक गैरव्यवहार करून हे परवाने मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. ईडीचे अधिकारी सध्या संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि बेकायदेशीर कागदपत्रांची छाननी करत आहेत. या कारवाईमुळे चंदीगड आणि पंजाबमधील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे हादरे बसले असून, अनेक बड्या बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world