जाहिरात

कोरोना पृथ्वीवर, परिणाम चंद्रावर; वैज्ञानिकांचा संशोधनातून मोठा दावा

नासाच्या मून एक्सप्लोरेशन ऑर्बिटरच्या डेटाचा वापर करून, संशोधकांना असे आढळले की लॉकडाऊन कालावधीत चंद्राचे तापमान 8 ते 10 केल्विनने (उणे 265.15 ते उणे 263.15 अंश सेल्सिअस) कमी झाले.

कोरोना पृथ्वीवर, परिणाम चंद्रावर; वैज्ञानिकांचा संशोधनातून मोठा दावा

जगभरात पसरलेल्या कोरोना लाटेचा परिणाम चंद्रावर देखील झाल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी याबाबतचं संशोधन केलं होतं. एप्रिल-मे 2020 मध्ये कडक लॉकडाऊन दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात घट नोंदवण्यात आली होती.

फिजिक्स रिसर्च लॅबच्या (PRL) के. दुर्गा प्रसाद आणि जी. अम्बिली यांनी 2017 ते 2023 दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर सहा ठिकाणी नऊ वेळा तापमान नोंदवले. ओशनस प्रोसेलेरम, मारे सेरेनिटाटिस, मारे इम्ब्रिअम, मारे ट्रॅनक्विलिटाटिस आणि मारे क्रिसियम याठिकाणी तापमान नोंदवलं गेलं होते.  पीआरएलचे अनिल भारद्वाज यांनी याबाबत म्हटलं की, आमच्या ग्रुपने एक महत्त्वाचे काम केले आहे, जे युनिक आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नासाच्या मून एक्सप्लोरेशन ऑर्बिटरच्या डेटाचा वापर करून, संशोधकांना असे आढळले की लॉकडाऊन कालावधीत चंद्राचे तापमान 8 ते 10 केल्विनने (उणे 265.15 ते उणे 263.15 अंश सेल्सिअस) कमी झाले. लॉकडाऊन दरम्यान नोंदलेल्या तापमानाची तुलना मागील वर्षांतील तापमानाशी करण्यात आली. दुर्गा प्रसाद यांनी म्हटलं की, आम्ही 12 वर्षांच्या डेटाचा अभ्यास केला आहे. मात्र संशोधनात 2017 ते 2023 पर्यंतचा डेटाच वापरला आहे.

(नक्की वाचा-  मुंबई-पुणे अंतर कमी होणार? एक्स्प्रेस वेवरील या प्रकल्पामुळे अपघातातही घट होणार? )

संशोधकांचं असं म्हणणं आहे की, लॉकडाऊनमुळे पृथ्वीवरील रेडिएशनमध्ये घट झाली होती. त्यामुळे चंद्राचे तापमानही कमी झाले आहे. ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे हरित वायू आणि एरोसोल उत्सर्जनातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. याचा परिणाम असा झाला की पृथ्वीच्या वातावरणात अशा वायूंचा प्रभाव कमी झाला आणि वातावरणातून उष्णतेचे उत्सर्जन कमी झाले.

(नक्की वाचा-  5 बोगदे, 16 पूल! मुंबईत येताना कसारा घाट लागणारच नाही; समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पाही 99% पूर्ण  )

संशोधन पेपरमध्ये असे म्हटले आहे की, चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानावर सोलार अॅक्टिव्हिटी आणि हंगामी प्रभावाचा देखील अभ्यास करण्यात आला होता. परंतु असे आढळून आले की त्यांचा पृष्ठभागाच्या तापमानावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे कोविड लॉकडाऊनमुळे चंद्राच्या तापमानात घट झाल्याचे अभ्यासाचे निष्कर्ष सिद्ध करतात. मात्र संशोधकांनी कबूल केले आहे की पृथ्वीवरील रेडिएशन आणि चंद्राचे तापमान यांच्यातील संबंध स्थापित करण्यासाठी अधिक डेटाची आवश्यकता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
मज्जाच मज्जा! नव्या प्रीपेड प्लॅनमध्ये अल्पदरात दररोज मिळेल 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
कोरोना पृथ्वीवर, परिणाम चंद्रावर; वैज्ञानिकांचा संशोधनातून मोठा दावा
terrorist Afzal Guru brother Ejaz Ahmed contesting elections from Jammu and Kashmir Sopore assembly constituency
Next Article
जम्मू-काश्मीरच्या राजकीय मैदानात दहशतवादी अफजल गुरूचा भाऊ, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार?