जाहिरात

गळ्यात पट्टा टाकून कुत्र्याप्रमाणे पाणी पाजलं, टार्गेट पूर्ण न केल्यानं कर्मचाऱ्याला भयंकर शिक्षा

कर्मचाऱ्याचा परफॉमन्स खराब असल्याने मालकाने त्याला शिक्षा दिल्याचं सांगितलं जात आहे.

गळ्यात पट्टा टाकून कुत्र्याप्रमाणे पाणी पाजलं, टार्गेट पूर्ण न केल्यानं कर्मचाऱ्याला भयंकर शिक्षा

केरळच्या कोची शहरातून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. येथे पेरुमांवूरमधील एका खासगी कंपनीत कर्मचाऱ्याला चुकीची वागणूक देण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला जात आहे. 

कर्मचाऱ्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून त्याला ऑफिसात  कुत्र्यासारखं गुडघ्यावर चालविण्यात आलं. इतकत नाही तर कुत्र्यासारखं त्याला पाणी पिण्याची जबदरस्ती करण्यात आली. त्याचे कपडे काढण्यात आले आणि त्याला मारहाण करण्यात आली.  कर्मचाऱ्याला शिक्षा देण्यासाठी कंपनीच्या मालकाने हे धक्कादायक कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली. मात्र NDTV मराठी या बातमी आणि व्हिडिओची पुष्टी करीत नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केरळचे कामगार मंत्री शिवनकुट्टींनी या प्रकरणात अहवाल मागितला आहे. त्यांनी सांगितलं की, केरळमधील कामगारांचे कायदे कडकपणे लागू केली जातात. कोणत्याही प्रकारे कामगार किंवा कर्मचाऱ्यांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. 

12 वर्षांपूर्वी आयुष्यात आलं होतं मोठं वादळ, भाषणादरम्यान बेशुद्ध पडलेल्या तरुणीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण

नक्की वाचा - 12 वर्षांपूर्वी आयुष्यात आलं होतं मोठं वादळ, भाषणादरम्यान बेशुद्ध पडलेल्या तरुणीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण

एनबीटीमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, एर्नाकुलम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही एक सेल्स कंपनी असून घरा-घरांमध्ये जाऊन सामान विकते. सुरुवातीच्या तपासानुसार, गेल्या तीन महिन्यांपासून कंपनीत एकही पुरुष कर्मचारी नाही. तेथे केवळ महिला कर्मचारी काम करतात. अधिकाऱ्यांकडून सर्व महिला कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे

टार्गेट पूर्ण न केल्याची शिक्षा...
कर्मचाऱ्याचा परफॉमन्स खराब असल्याने मालकाने त्याला शिक्षा दिल्याचं सांगितलं जात आहे. कर्मचाऱ्याला साखळदंडांनी बांधून कुत्र्याप्रमाणे गुडघ्यावर चालण्यास भाग पाडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जमिनीवर काही नाणी फेकण्यात आली आणि कर्मचाऱ्याला ती नाणी चाटण्यास सांगण्यात आलं. कुत्र्याच्या जेवणाच्या भांड्यात पाणी भरून कुत्र्याप्रमाणे पाणी पिण्याची जबरदस्ती करण्यात आली, अशी माहिती आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: