
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्याच्या पांडा शहरातील रा.गे शिंदे महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी भाषण करता करताच चक्कर आल्याने खाली कोसळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. वर्षा खरात असं या मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती बीएसीच्या शेवटच्या वर्गात शिकत होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
साधारण 20-21 वर्षांच्या तरुणीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात होती. आनंदात हसत-खेळत भाषण करीत असताना तरुणीला अचानक काय झालं, असा सवाल उपस्थित केला जात होता. आतापर्यंत जीममध्ये, गरबा खेळताना अचानक मृत्यू ओढवल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. मात्र बोलता बोलता अचानक तरुणीच्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
नक्की वाचा - Latur Crime : लातूर मनपा आयुक्तांचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, रात्री कुटुंबीयांसोबत जेवले अन्...
रा.गे शिंदे महाविद्यालयामध्ये बीएससीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वर्षा खरात भाषण करत होती. स्टेजवर हसत हसत भाषण करत असतानाच वर्षाला अचानक भोवळ आली अन् ती खाली कोसळली.
भाषण करता करता कोसळली,
— Gangappa Pujari (@GangappaPujar07) April 5, 2025
विद्यार्थीनीचा मृत्यू, धाराशीवमधील घटना#Dharashivnews #Viralvideo pic.twitter.com/hABp79JY2x
तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मात्र मुलीचं पोस्टमार्टम करण्यात आलं नाही. तरी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू ओढवल्याचं सांगितलं जात आहे. वर्षाची 12-13 वर्षांपूर्वी ओपन हार्ट सर्जरी झाली होती. त्याशिवाय काही दिवसांपासून ती आजारी होती. त्यातून तिला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world