Delhi Blast Eye Witness : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर या स्फोटाच्या घटनेत एकूण 24 लोक गंभीर जखमी झाल्याचं समजते. स्फोट झाल्यानंतर एक तरुण जोरजोरात ओरडला आणि पळत गेला. "माझा भाऊ..माझा भाऊ..", अशी हाक तो प्रत्यक्षदर्शी मारत होता. यावरून हा स्फोट किती भीषण असेल, याचा अंदाज येऊ शकतो. चारही बाजूला मोठमोठे धुराचे लोट पसरले होते. अनेक गाड्यांना आग लागल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. कारमध्ये स्फोट होताच जवळपास 3-4 गाड्या जळून खाक झाल्या. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं.
स्फोट इतका भीषण होता की...
प्राथमिक तपासात उघडकीस आलंय की, हा कोणताही सामान्य स्फोट नव्हता. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या गर्दीच्या भागात विशेष पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना तैनात करण्यात आलं आहे. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचायला सुरुवात झाली आहे. स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूला उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना आग लागली आणि त्यांचा चक्काचूर झाला. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाल्याची शक्यता आहे.
#WATCH | Delhi: Blast near Red Fort Metro Station | Delhi Police's FSL team carry out investigation at the spot. pic.twitter.com/VZ3V1IKijN
— ANI (@ANI) November 10, 2025
नक्की वाचा >> दिल्लीत स्फोटांची मालिका...कधी अन् कुठे झाले होते भीषण स्फोट? लाल किल्लाही हादरला होता, वाचा A To Z माहिती
दिल्ली फायर ब्रिगेडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं की, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता खूपच जास्त होती आणि अनेक लोक जखमी झाल्याची शक्यता आहे."घटनेनंतर लगेचच दिल्ली पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आणि सात अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून तपास सुरू केला आहे.प्रत्यक्षदर्शींनुसार, एका व्यक्तीने सांगितले की, "मी गुरुद्वाऱ्यात होतो, तेवढ्यात एक जोरदार स्फोटाचा आवाज आला. सुरुवातीला काय झालं हे समजलं नाही, पण बाहेर येताच पाहिलं की अनेक गाड्या जळत होत्या आणि लोक घाबरून इकडे तिकडे पळत होते.
नक्की वाचा >> मुंबईत होणार 70 km अंडरग्राऊंड रोड! वाहतूक कोंडी फुटणार..कोस्टल रोड, BKC अन् एअरपोर्ट 'या' एकाच टनेलला जोडणार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world