जाहिरात

आयुष्य कसं जगावं? खरंच..'या' मुलीकडून शिकावं..कॅन्सर पीडितेनं डॉक्टरसोबत बनवला जबरदस्त प्रेरणादायी VIDEO

Cancer Patient And Doctor Viral Video : ​​​​​​​रोजच्या धावपळीच्या जीवनात मृत्यूचं दार कधी उघडेल, याचा काही नेम नाही. सध्याच्या घडीला हार्ट अटॅक, अपघाताने अनेक लोकांचा अकाली मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

आयुष्य कसं जगावं? खरंच..'या' मुलीकडून शिकावं..कॅन्सर पीडितेनं डॉक्टरसोबत बनवला जबरदस्त प्रेरणादायी VIDEO
Cancer Patient Viral Video
मुंबई:

Cancer Patient And Doctor Viral Video : रोजच्या धावपळीच्या जीवनात मृत्यूचं दार कधी उघडेल, याचा काही नेम नाही. सध्याच्या घडीला हार्ट अटॅक, अपघाताने अनेक लोकांचा अकाली मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शरीर कधी साथ सोडेल आणि भयंकर आजारामुळे मृत्यू होईल,याचा अंदाज बांधणं कठीणच आहे. पण कोणत्याही व्यक्तीनं आयुष्यात हिम्मत हारू नये..अतिशय गंभीर परिस्थितीतही संकटांवर मार करून आनंदाने जीवन जगावं. हेच एका कॅन्सर पीडित मुलीनं डॉक्टरसोबत काढलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे. 

असे अनेक रुग्ण असतात, ज्यांना जगण्याची कोणतीच आशा नसते. पण काही लोक इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. ज्यांनी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर हसत खेळत मात केली आहे. अतिशय कठीण काळातही कॅन्सरवर मात करणाऱ्या अनेक रुग्णांचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशाच प्रकारचा एका कॅन्सर पीडित तरुणीचा प्रेरणादायी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुलीनं डॉक्टरसोबत बनवलेला हा सुंदर व्हिडीओ पाहून अनेकांच्या मन प्रसन्न झालं असेल,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये त्रिझाने 1959 चा सिनेमा 'बरखा'चं प्रसिद्ध गाणं 'तडपाओगे तडपा लो'वर परफॉर्म करत व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिनं हे सिद्ध केलं आहे की, कॅन्सर शरीराला ओळखू शकतं. पण माणसाच्या आत्म्याला तोडू शकत नाही. त्रिझा नावाच्या या महिलेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याला आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या मुलीची हिंम्मत, सकारात्मक विचारसरणी आणि एनर्जी पाहून सोशल मीडियावर लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

नक्की वाचा >> धनत्रयोदशीपूर्वी सूर्य-मंगळची होणार युती,'या'4 राशीच्या लोकांवर होणार लक्ष्मी-कुबेरची कृपा, मिळणार बक्कळ पैसा

'कॅन्सर माझं स्पीरिट तोडू शकत नाही'

या छोट्याशा व्हिडीओत त्रिझाने तिच्या डॉक्टरसोबत जुन्या गाण्यावर खूप चांगला परफॉर्म केलं आहे. व्हिडीओत पाहू शकता की, डॉक्टरही छान स्माईल देत कॅन्सर पीडित तरुणीचा आत्मविश्वास वाढवते. व्हिडीओ त्रिझाचे हावभाव आणि तिचं आत्मविश्वास हेच दाखवतो की, ती तिच्या आजाराला घाबरत नाही. तर कॅन्सरला शांतपणे आणि धाडस दाखवून सामोरं जाते. 

इथे पाहा कॅन्सर पीडित तरुणीचा आणि डॉक्टरचा सुंदर व्हिडीओ

तिने सर्वांना या गोष्टीची आठवण करून दिली आहे की, सर्वात कठीण काळातही 'आशा' हीच तुमची खरी ताकद असते. व्हिडीओ शेअर करत पोस्टमध्ये म्हटलंय, कॅन्सर माझ्या शरीराची परीक्षा घेऊ शकतं. पण ते माझ्या स्पीरिटला कधीच तोडू शकत नाही. प्रत्येक स्माईलसोबत मी आशा, प्रेम आणि जीवनाला निवडत आहे. 

नक्की वाचा >> कोहली बनणार जगातील नंबर 1 फलंदाज? सचिनचा 100 शतकांचा रेकॉर्ड मोडण्याची 'ही' एकमेव संधी, जाणून घ्या संपूर्ण गणित

या व्हिडीओला अनेक लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय,चिंता करू नका, तुम्ही ठीक व्हाल. तू खूप मजबूत आहेस बहीण..तर दुसऱ्या एका यूजरने कमेंटमध्ये लिहिलंय,मी तु्झ्यासोबत आहे. अन्य एकाने म्हटलंय, देव तुझं भलं करो बहीण..तु ठीक होशील..मजबूत राहा आणि तुझं हास्य असंच कायम ठेव.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com