दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच्या निवासस्थानी आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील (सोमवारी) कथित हल्ल्याप्रकरणी गुरुवारी रात्री एम्समध्ये त्यांच्यावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी कथित हल्ला प्रकरणात एफआयआर दाखल केला आणि मालीवाल यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना एम्समध्ये नेण्यात आलं.
स्वाती मालीवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांची प्रतीक्षा करीत असताना केजरीवालांचे खासगी सचिन बिभव कुमार आले आणि त्यांनी कारणास्तव त्यांना कानशिलात लगावली आणि त्यांना मारहाण केली. यानंतर आरोपी बिभव कुमार यांना पकडण्यासाठी पोलीस चंद्रावल नगर येथील त्यांच्या घरी गेले होते. येथे ते नव्हते, त्यामुळे क्राइम ब्रान्च आणि स्पेशल सेलची टीम त्यांचा शोध घेत आहे.
मला वारंवार कानशिलात लगावल्या...
'आप'च्या खासदारांनी दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलला दिलेल्या जबाबात सांगितलं की, मी खोलीत प्रतीक्षा करीत होती. त्यावेळी बिभव आले आणि मला शिव्या देऊ लागले. काहीही कारण नसताना ते मला मारहाण करीत होते. मी आरडाओरडा करीत होते, पण तरीही ते मला मारहाण करीत होते. पुढे मालीवाल म्हणाल्या, बिभव देव तिला धमकी देत होते. मला मासिक पाळी सुरू असल्याचं सांगितल्यानंतरही ते शांत बसले नाही. त्यांनी मला पोटावर, छातीवर आणि चेहऱ्यावर वार केलं. कशी बशी मी तेथून पळून गेल्याचं त्या म्हणाल्या.
नक्की वाचा - PM नरेंद्र मोदी निवृत्त होणार? अरविंद केजरीवालांनी असं वक्तव्य करुन काय साधलं?
मुख्यमंत्री केजरीवाल शांत का?
राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमार यांना आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्यासाठी बोलावलं होतं. तर केजरीवाल गुरुवारी समाजवादी पार्टीचे नेता अखिलेश यादव यांच्यासह एका संमेलनासाठी लखनऊला गेले होते. यादरम्यान त्यांना या घटनेबद्दल विचारण्यात आलं, मात्र त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. तर दुसरीकडे आपचे खासदार संजय सिंह यांनी सांगितलं की, पक्षाने यापूर्वीच यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world