Shivdeep Lande Property: बिहारचा सिंघम म्हणून ओळख असलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे मुंगेर आणि अररिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांनी दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आयपीएस अधिकारी म्हणून सेवा केल्यानंतर आता ते राजकारणात आपलं नशीब आजमावत आहेत. शिवदीप लांडे हे शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत त्यातून शिवदीप लांडे यांची संपत्ती समोर आली आहे. (Bihar Assembly Election 2025)
शिवदीप लांडे यांची संपत्ती किती? Shivdeep Lande Property
शपथपत्रातील माहितीनुसार, शिवदीप लांडे यांच्या बँक खात्यांमध्ये २० लाख ३३ हजार रुपये इतकी रक्कम जमा आहे. विशेष म्हणजे, त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये ६.६५ कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक (Investment) केली आहे, जी त्यांच्या एकूण संपत्तीचा मोठा भाग आहे. लांडे यांच्यावर २ कोटी ५ लाख रुपयांचे गृहकर्ज (Home Loan) देखील आहे.
तसेच, त्यांच्याकडे २० लाख रुपये किमतीची एक कार (Car) असल्याची नोंद आहे. शिवदीप लांडे यांच्या पत्नी ममता शिवदीप लांडे या एक बिझनेस वुमन (Business Woman) आहेत. त्यांच्याकडे १०० ग्रॅम सोने (100 gm Gold) असल्याची माहिती शपथपत्रात नमूद आहे. शपथपत्रानुसार, शिवदीप लांडे यांच्यावर कोणतेही गुन्हेगारी खटले (Criminal Cases) दाखल नाहीत.
Nagpur News: 'नागपूर महानगर पालिकेत दलालांचे राज्य', ठाकरेंनी ऐकवली 'ती' ऑडिओ क्लिप
शिवदीप लांडेंनी मुंगेरी मतदारसंघ का निवडला? Why Elect From Munger Assembly)
शिवदीप लांडे यांनी मुंगेर मतदारसंघ (Munger Assembly Election) विचारपूर्वक निवडला आहे. ते २००९ मध्ये मुंगेरमध्ये एएसपी म्हणून रुजू झाले होते आणि २०११ पर्यंत तिथेच काम केले. तीन वर्षांत मुंगेर मधील गुन्हेगारी संपवण्यावर भर दिला. त्यामुळे तेथिल तरुणाईत शिवदीप लांडे यांची लोकप्रियता आहे. त्यानंतर शिवदीप यांनी आयजी पदाचा राजीनामा दिला.
📍 फरदा, 166 - जमालपुर विधानसभा क्षेत्र
— Shivdeep Wamanrao Lande (@ShivdeepLande) October 23, 2025
जनसंपर्क और आशीर्वाद यात्रा के मौके पे फरदा गांव में लोगों का अपार स्नेह और उत्साह देखने को मिला।
हर घर से मिला प्यार, हर दिल से मिला आशीर्वाद — यही हमारी असली ताकत है।#जनसंपर्क #आशीर्वाद #Jamalpur #ShivdeepLande #GasCylinder13… pic.twitter.com/u1Jnr42zI6
भाजप उमेदवाराचे तगडे आव्हान...
भाजपने मुंगेर विधानसभा मतदारसंघात प्रणय कुमार यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे शिवदीप लांडे यांचा सामना भाजपच्या प्रणय कुमार यांच्याशी होणार आहे. प्रणय कुमार हे तारापूर जिल्ह्यातील असून ते वैश्य समाजाचे आहेत. वैश्य समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपनं प्रणय यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे मुंगेर मतदारसंघात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. शिवदीप लांडे यांनी सेवेत असताना केलेल्या कामाच्या आधारावर मतदार मतदान करणार का हे पहावं लागेल.
Lokpal BMW Car Tender: 'साधेपणा'ची शपथ घेणाऱ्या लोकपालला BMW चा मोह; 70 लाखांच्या 7 कारसाठी टेंडर
प्रणय कुमार यांच्याकडे बँक खात्यात १३ लाख ४१ हजार रुपये इतकी रक्कम जमा आहे. सोने आणि चांदीच्या स्वरूपातही त्यांच्याकडे मोठी मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ३० लाख रुपये किमतीचे सोने (Gold) आहे, तर १ लाख ३० हजार रुपये किमतीची चांदी (Silver) देखील त्यांच्या मालकीची आहे तसेच प्रणय कुमार यांच्यावर २८ लाख ४१ हजार रुपयांचे कर्ज (Loan) आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world