उद्योजक होणं हे आपलं लक्ष होतं. त्यासाठी मुंबई गाठलं. त्यावेळी पहिल्यांदा डायमंड ट्रेडिंग केलं. डायमंड ट्रेडिंग हे उद्योजक बनवण्याच्या दिशेनं आपलं पहिलं पाऊल होतं असं अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनी सांगितलं. जयपूर इथं आयोजित इंडिया जेम अँण्ड ज्वेलरी अॅवॉर्ड कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी डायमंड ट्रेडिंग हे माझं उद्योजक बनण्याच्या दिशेचं पहिलं पाऊल होतं हे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1978 साली वयाच्या 16 व्या वर्षी शाळा,अहमदाबादमधील घर सोडलं असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यावेळी मुंबईचं वन-वे तिकीट काढलं. मला काय करणार हे मला काहीही माहिती नव्हतं. पण, उद्योजक व्हायचं हे माझं नक्की होतं असं त्यांनी सांगितलं. मुंबई या शहरातच मला ही संधी मिळणार याची खात्री होती. त्या दृष्टीने मेहनत करण्यास सुरूवात केली.
ट्रेंडिंग बातमी - 'प्रत्येक हल्ला आम्हाला भक्कम करत आहे', अमेरिकेतील आरोपांना गौतम अदाणींचं उत्तर
मुंबईत आपल्याला संधी मिळणार हे आपल्याला माहित होतं. पहिली संधी मिळाली ती महिद्रा ब्रदर्स बरोबर. त्यांच्याकडून डायमंडच्या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर मी पहिली डिल केली गेली. ती डिल जपानी क्लायंटसोबत होती. ही डिल यशस्वी झाली. त्यातून मला 10,000 रुपये कमिशन मिळालं होतं, अशी आठवण यावेळी आदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनी सांगितली.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदेंच्या गावातल्या गावकऱ्यांना काय वाटतं?
इथ पासूनच आपला उद्योजक होण्याचा प्रवास सुरू झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आपल्यावर अनेक आरोप झाले. पण आपल्यावर झालेले अनेक आरोप टीका आपल्याला आणखी भक्कम करत गेले आहे. यापुढेही आम्ही भक्कम होवू आणि पुढे चालत राहू असा निर्धार यावेळी अदाणी यांनी केला. आम्हाला केला जाणार प्रत्येक राजकीय विरोध आमची ताकद वाढवणाराच ठरणार आहे असंही ते यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world