Uttar Pradesh Crime News: प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याचा बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने काटा काढल. गाजियाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात सामील असलेल्या पत्नीसह 5 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक आसिफच्या पत्नीचे त्याचाच मित्र रिहानसोबतचे संबंध वाढले होते. यातून अरसी गर्भवती देखील होती. याची माहिती मिळाल्यानंतरही आसिफ आपल्या पत्नीला थांबवू लागला. यामुळे नाराज झालेल्या अरसी आणि तिच्या प्रियकर रिहानने आसिफच्या हत्येचा कट रचला.
नेमके काय घडले?
7 ऑक्टोबरच्या रात्री सुमारे 8.15 वाजता ही घटना घडली. आसिफ उर्फ गुल्लू स्कूटीवरून जात होता. त्यावेळी रफीकाबाद फाटकाजवळ आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा भाऊ भूरे उर्फ अन्वर याने रिहान, बिलाल, फरमान आणि दोन-तीन अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
मुख्य आरोपी रिहान मृत आसिफचा जुना मित्र होता. मार्च 2024 मध्ये आसिफ तुरुंगात असताना रिहानचे आसिफची पत्नी अरसी उर्फ प्राची हिच्यासोबत संबंध वाढले. दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले आणि त्यांनी एकत्र राहण्याची योजना आखली. एप्रिल 2025 मध्ये आसिफ जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याला दोघांच्या संबंधांची कुणकुण लागली. पत्नी गर्भवती असल्याचे आसिफला कळाले. तरी देखील आसिफने पत्नीला थांबवण्यास सुरुवात केली आणि तिचा मोबाईलही आपल्याकडे ठेवला. यामुळे नाराज झालेल्या अरसीने रिहानला सोबत घेऊन आसिफला संपवण्याचे ठरवले.
(नक्की वाचा- Rajasthan News: आईचा आक्रोश, बापाची विनंती! निर्दयी लेकीला पाझर फुटेना, बॉयफ्रेंडसाठी घर सोडलं; VIDEO व्हायरल)
पत्नी आणि मित्राने मिळून रचला कट
सुरुवातीला अरसीने गोळ्या देऊन आसिफचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण मात्र तो कट सफल झाला नाही. त्यानंतर रिहानने त्याचा साथीदार बिलाल, जीशान, उवैश, गुलफाम आणि दानिश यांच्यासोबत मिळून आसिफच्या हत्येचा कट रचला. योजनेनुसार, 7 ऑक्टोबरच्या संध्याकाळी सर्व आरोपी रफीकाबाद फाटकाजवळ जमा झाले. अरसीने रिहानला माहिती दिली की आसिफ तिथे येत आहे. आसिफ स्कूटीवरून तिथे पोहोचताच रिहान, जीशान आणि उवैश यांनी 315 बोरच्या पिस्तुलातून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आसिफचा जागीच मृत्यू झाला आणि आरोपी पळून गेले.
पोलिसांनी 9 ऑक्टोबर रोजी रिहान, बिलाल, जीशान, उवैश आणि अरसी उर्फ प्राची यांना अटक केली. पोलिसांनुसार, मुख्य आरोपी रिहानवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचे 4 गुन्हे, तर उवैशवर हत्येचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा आधीच दाखल आहे. इतर आरोपींच्या गुन्हेगारी इतिहासाची माहिती गोळा केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world