जाहिरात

Google Map ठरला जीवघेणा! कारमध्ये तडफडून दोघांचा मृत्यू, वाचा कसा झाला अपघात?

गूगल मॅपवर (Google Map) रस्ता पाहून प्रवास करणे जीवघेणा ठरल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Google Map ठरला जीवघेणा! कारमध्ये तडफडून दोघांचा मृत्यू, वाचा कसा झाला अपघात?
मुंबई:

गूगल मॅपवर (Google Map) रस्ता पाहून प्रवास करणे जीवघेणा ठरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत गूगल मॅपच्या मदतीनं प्रवास करणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. या कारमध्ये चार जण जण होते. त्यामधील दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जणांची अवस्था गंभीर आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये हा धक्कादायक अपघात झाला आहे. या अपघातामधये मृत पावलेल्या दोन तरुणींची नावं सिमरन आणि शिवानी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही जखमींनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार मुरादाबादमधील मुंढापांडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. कारमधील सर्वजण नैनीतालहून परत येत होते. हा अपघात झाला त्यावेळी कार आतमधून लॉक झाली होती. त्यामुळे आतील व्यक्तींना बाहेर पडता आले नाही. दिल्ली-लखनौ महामार्गावर रात्री 12 च्या सुमारास हा अपघात झाला. ही कार टर्न घेण्याचा प्रयत्न करत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकनं तिला धडक दिली. 

( नक्की वाचा : Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं! )

मुरादाबाद शहर पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक दिल्लीहून रामपूरला जात होता. तर कार रामपूरहून दिल्लीकडं चालली होती. त्यावेळी त्या दोघांमध्ये जोरदार धडक झाली. कारमध्ये चार जण होते. त्यामधील दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण हरियाणातील रोहतकचे होते. ते नैनीतालमधून परत चालले होते.

Latest and Breaking News on NDTV

Google Map ठरलं करण

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार गूगल मॅपनुसार हे सर्व जण दिल्ली रस्ता मुरादाबादहून क्रॉस होऊ झिरो पॉईंटकडं जात होते. त्या ठिकाणी वळत असताना हा अपघात झाला. हे सर्वजण बायपास सोडून दिल्लीकडं जाणाऱ्या रस्त्याला जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळीच हा अपघात झाला. 

यापूर्वीही झाला होता अपघात

यापूर्वी गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्येही असाच एक प्रकार घडला होता. त्या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला होता. जीपीएस सिस्टमच्या विश्वासावर कारमधील 3 जण जात होते. त्यांना जीपीएसवर अर्धवट पुलचा रस्ता दिसत होता. त्या पुलावरुन खाली पडल्यानं दोन भावांसह तिघांचा मृत्यू झाला होता. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: