जाहिरात

Gujrat News: 80 कोटींच्या मालकाने आश्रमात जीव सोडला, उद्योजक मुलांचा अंत्यसंस्कारालाही नकार; प्रसिद्ध लेखकाची करुण कहाणी

श्रीनाथ खंडेलवाल यांचा मुलगा मोठा उद्योजक आहे, मुलगी सुप्रीम कोर्टात वकील आहे, तरीही त्यांच्या अंत्यविधीला, अखेरच्या क्षणी आधार द्यायला मात्र कोणीही आलं नाही. 

Gujrat News: 80 कोटींच्या मालकाने आश्रमात जीव सोडला, उद्योजक मुलांचा अंत्यसंस्कारालाही नकार; प्रसिद्ध लेखकाची करुण कहाणी

गुजरात: आई वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर झटतात, काबाडकष्ट करतात, त्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचावं, क्षितिजापल्याड झेप घ्यावी हीच त्यांची इच्छा असते. याबदल्यात मुलांनी आपल्या म्हातारपणी आधाराची काठी व्हावं, एवढीच त्यांची माफक अपेक्षा. मात्र काही पालकांच्या तेही नशिबी नसतं. 

गुजरातमधून असाच एक मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या साहित्यक्षेत्रातील मोठे नाव असलेले प्रसिद्ध लेखक, तब्बल 80 कोटींच्या संपत्तीचे मालक  श्रीनाथ खंडेलवाल यांचे अनाथाश्रमात निधन झाले. दुर्दैवी बाब म्हणजे श्रीनाथ खंडेलवाल यांचा मुलगा मोठा उद्योजक आहे, मुलगी सुप्रीम कोर्टात वकील आहे, तरीही त्यांच्या अंत्यविधीला, अखेरच्या क्षणी आधार द्यायला मात्र कोणीही आलं नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

साहित्यिक असण्याबरोबरच  श्रीनाथ खंडेलवाल हे आध्यात्मिक पुरुषही होते. त्यांनी शिवपुराण आणि तंत्रविद्या यावर अनेक ग्रंथ लिहिले होते. त्यांचे दिवस आणि रात्र साहित्य आणि अध्यात्मात गेले. याचाच फायदा घेत त्यांच्या मुलाने व मुलीने त्यांची सर्व संपत्ती हिसकावून घेतली आणि त्यांना एकटे सोडले. त्यानंतर काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन काशी येथील वृद्धाश्रमात ठेवले. या वृद्धाश्रमात ते सुमारे दहा महिने राहिलेस तेथे त्यांना मोफत सेवा देण्यात आली. पण एकदाही त्यांच्या कुटुंबातील कोणीही तिथे भेटायला आले नाही. 

श्रीनाथ खंडेलवाल खंडेलवाल यांच्या साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल 2023 मध्ये त्यांना पद्यश्री पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले. खंडेलवाल यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. श्रीनाथ खंडेलवाल यांनी सुमारे 400 पुस्तके लिहिली आणि अनुवादित केली. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची मुले अंत्यदर्शनासाठी आली नाहीत.त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी येण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी समाजसेवक अमन यांनी देणगी गोळा करून अंत्यसंस्कार केले.

ट्रेंडिंग बातमी - New Year special: नव्यावर्षात जन्मलेल्या मुलीला 'या' शहरात दिलं जातं सोन्याचं नाणं, काय आहे प्रथा?

दरम्यान, श्रीनाथ खंडेलवाल यांनी आपल्या लेखनाने भारतीय साहित्य समृद्ध केले. त्यांनी शिवपुराण, मत्स्य पुराण यांसारख्या मौल्यवान ग्रंथांचे हिंदीत भाषांतर केले आहे. त्यांनी लिहिलेले 3000 पानांचे मत्स्य पुराण आजही विद्वानांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांनी केवळ धार्मिक ग्रंथांवर काम केले नाही, तर आधुनिक साहित्य आणि इतिहासावर अनेक पुस्तके लिहिली. त्यांची पुस्तके हिंदी, संस्कृत, आसामी आणि बंगाली या भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: