पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक हमखास मिळवून देण्याची खात्री या कुस्तीपटूकडून होती त्या विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं. 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेशला पुढील सामने चालू ऑलिम्पिकमधील खेळण्यावर बंदी घालण्यात आली. ज्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. पदक निश्चित झालेल्या विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. कुस्तीच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं वजन अवघ 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं होतं.यामुळे विनेशला पुढचा एकही सामना खेळता आला नाही.
हे ही वाचा : सोनेरी स्वप्न भंगलं! बाहुबलींना टक्कर, फायनलमध्ये एन्ट्री... पण पदरी निराशा
विनेशला ज्या पद्धतीने या स्पर्धेबाहेर जावे लागले ते अत्यंत वेदनादायी होते. विनेशने या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला असून तिची बाजू जगप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ मांडणार आहेत. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टस अर्थात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर सदर प्रकरणाची सुनावणी होणार आहे. लवादासमोर कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानचे दात घशात घालणाऱ्या देशाचे नामवंत वकील हरीश साळवे हे विनेश फोगाटची बाजू मांडणार आहेत. ही सुनावणी आज होणार असून हरीश साळवे यांनी विनेश फोगाटची बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी सदर प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
हे ही वाचा : विनेश फोगाटचं वजन कसं वाढलं?
कोण आहेत हरीश साळवे?
देशातील अत्यंत हुशार, कायद्याचा उत्तम अभ्यास असलेले आणि सर्वात महागडे वकील म्हणून साळवे यांचा लौकीक आहे. अनेक मोठमोठ्या प्रकरणांमध्ये त्यांनी आपल्या अशिलांना न्याय मिळवून दिला आहे. हरीश साळवे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाचे नाव आहे. महाराष्ट्रातील एका मराठी कुटुंबामध्ये 22जून 1955 रोजी हरीश साळवे यांचा जन्म झाला होता. हरीश यांचे आजोबा हे अत्यंत निष्णात आणि प्रसिद्ध वकील होते. आपल्या आजोबांचा वारसा हरीश साळवे यांनी नुसताच पुढे नेला नाही तर त्या वारशाचा लौकीक अशा उंचीवर नेऊन ठेवला जिथपर्यंत पोहोचणे हे मुश्कील आहे. मूळच्या नागपूरच्या असलेल्या साळवे यांनी आपले शिक्षण नागपूरच्या सेंट फ्रान्सिस डी सेल्स शाळेत झाले होते. ICAI चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी LLB चे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
हरीश साळवे यांनी लढलेले मोठे खटले
- 1975 सालचे दिलीप कुमार यांच्याविरोधातील काळ्या पैशाच्या आरोपाखाली दाखल झालेला खटला
- वोडाफोनवर करण्यात आलेल्या 14200 कोटींच्या कर चोरीच्या आरोपांचा खटला
- सलमान खान हिट अँड रन केस
- आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांची बाजू मांडली
- महिंद्रा, टाटा यासारख्या उद्योग घराण्यांच्यावतीने बाजू मांडली
2017 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी साळवे यांनी फक्त 1 रुपये इतके मानधन घेण्याचा निर्णय घेतला होता. काही बातम्यांनुसार साळवे यांची एकूण संपत्ती ही 200-250 कोटींच्या घरात आहे. देशातील अनेक बडी मंडळी, उद्योगपती, कंपन्या या साळवे यांचे क्लाएंट आहेत. काही वृत्तांनुसार साळवे यांची दिवसाची कमाई 15-20 लाख रुपये आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट प्रकरणांमध्ये साळवे 30-35 लाख रुपये फी घेतात. हरीश साळवे यांच्यामुळेच कुलभूषण जाधव यांना झालेली फाशीची शिक्षा रद्द झाली होती. आता हेच साळवे विनेशला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावलेत. संपूर्ण भारत देश विनेशला न्याय मिळेल अशी प्रार्थना करत असून या समस्त भारतीयांची आशा हरीश साळवे यांच्या एन्ट्रीमुळे पल्लवित झाल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world