
Pakistan Defense Minister Khawaja Muhammad Asif : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे सतत भारताविरुद्ध विष ओकत आहेत. भारताला अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांची भारताने बोलती बंद केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे भारतातील अधिकृत x अकाउंट बॅन केले आहे. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड; दहशतवादी हाशिम मूसा पाकिस्तानी पॅरा कमांडो)

याआधी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकी दिली होती की पाकिस्तान पूर्णपणे सतर्क आहे. मात्र पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांचा वापर तेव्हाच करेल जेव्हा अस्तित्वाला थेट धोका असेल. पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत चीन आणि रशियाचा समावेश करण्याची मागणीही यापूर्वी केली होती. एवढेच नाही तर याआधी अनेक वेळा पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताविरुद्ध द्वेषपूर्ण विधाने केली आहेत.
(नक्की वाचा- Kashmir Zipline Video : 7 मिनिटांच्या अंतराने वाचलो, हल्ल्यावेळी झिपलाइन व्हिडिओ करणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव)
अनेक YouTube चॅनल्सवर बंदी
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात कारवाईचा पवित्रा घेतला आहे. भारत सरकारने अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर कारवाई करत त्यांच्यावर बंदी घातली आहे.भारताने पाकिस्तानच्या डॉन न्यूज, इर्शाद भट्टी, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, समा स्पोर्ट्स, जीएनएन, उजैर क्रिकेट, उमर चीमा एक्सक्लुझिव्ह, आस्मा शिराजी, मुनीब फारूक , सुनो न्यूज एचडी आणि रझी नामा या चॅनल्सवर बंदी घातली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world