जाहिरात

India first : 'जगाला भारताची खरी शक्ती कळेल', गौतम अदाणी यांनी व्यक्त केली भावना

अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनीही ट्वीट करत IndiaFirst असं म्हटलं आहे.

India first : 'जगाला भारताची खरी शक्ती कळेल', गौतम अदाणी यांनी व्यक्त केली भावना

भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. पाकिस्तानचे ड्रोन ही भारताने पाडले आहेत. त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला परतवून लावण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताना हादरून गेला आहे. भारतीय सैन्याला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. शिवाय कौतूक ही केलं जात आहे. अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनीही ट्वीट करत IndiaFirst असं म्हटलं आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की अशा परिस्थितीत जग भारताची खरी ताकद आणि एकता अनुभवत आहे. जी तिच्या समानतेतून आणि विविधतेतूनही निर्माण झाली आहे. आम्ही एकजुटीने उभे आहोत.  आमच्या सशस्त्र दलांना मातृभूमीच्या आत्म्याचे आणि आमच्या आदर्शांच्या भावनेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे साथ देण्यास कटिबद्ध आहोत. #IndiaFirst जय हिंद! असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - S-400 SAM: भारताचे ‘सुदर्शन चक्र' काय आहे? ज्यामुळे पाकिस्तानचा रात्रीचा हल्ला झाला निष्फळ

दरम्यान पाकिस्तानी हवाई दलाचे F-16 सुपरसोनिक लढाऊ विमान संध्याकाळी  जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीने पाडण्यात आले. अशी माहिती एनडीटीव्हीला सुत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे. हे एफ-16 विमान पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावरून उडाले होते. ते पाकिस्तानी हवाई दलाचे एक महत्त्वाचे हवाई केंद्र आहे. भारतीय एसएएम (Surface-to-air missile) ने हे लढाऊ विमान सरगोधा हवाई तळाजवळ पाडले, असे सूत्रांनी सांगितले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्यांचे सर्व मनसूबे उधळवून लावले आहेत. पाकिस्ताननं सीमा भागात ही सीझ फायरचं उल्लंघन करणे सुरुच ठेवले आहे. तीथे जोरदार गोळीबार केला जात आहे. त्यात निष्पाप नागरिकांचाही बळी गेला आहे. तर संध्याकाळच्या वेळी जम्मू काश्मीरमध्ये ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. पण हा हल्ला भारताने उधळवून लावला आहे. घबरदारी म्हणून सीमा भागात ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे.  
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com