जाहिरात

Indian Army PC: पाकिस्तानला पाणी कसं पाजलं? भारतीय लष्कराचे 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठे खुलासे

या पत्रकार परिषदेत डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशंसचे प्रमुख राजीव घई आणि एयर मार्शल एके भारती यांनी ऑपरेशन सिंदूरसह पाकिस्तानसोबतच्या तणावावर महत्त्वाचे खुलासे केले.

Indian Army PC: पाकिस्तानला पाणी कसं पाजलं? भारतीय लष्कराचे 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठे खुलासे

Indian Army Press Conference: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामध्ये युद्धविरामाचं आणि शस्त्रसंधीचं वळण आलेलं असतानाच सोमवारी भारत आणि पाकिस्तानचे DGMO एकमेकांशी चर्चा करणार  असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेआधी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशंसचे प्रमुख राजीव घई आणि एयर मार्शल एके भारती यांनी ऑपरेशन सिंदूरसह पाकिस्तानसोबतच्या तणावावर महत्त्वाचे खुलासे केले.

नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे: 

एअर मार्शल ए.के. भारती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'काल आपण पीओके आणि पाकिस्तानमध्ये यशस्वीरित्या नष्ट झालेल्या दहशतवादी पायाभूत सुविधांबद्दल बोललो. आमची लढाई फक्त दहशतवादाविरुद्ध आहे आणि आम्ही दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले होते परंतु पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले आणि ती त्यांची लढाई बनवली. या परिस्थितीत आमची प्रत्युत्तराची कारवाई आवश्यक होती आणि यामध्ये त्यांचे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी ते स्वतः जबाबदार आहेत.

तसेच "आमच्या युद्ध-सिद्ध प्रणालींनी चोख कामगिरी बजावली आणि सडेतोड उत्तर दिले. आणखी एक खास गोष्ट म्हणजे स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली, आकाश प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी केली. गेल्या दशकात भारत सरकारकडून मिळालेल्या अर्थसंकल्पीय आणि धोरणात्मक पाठिंब्यामुळेच एक मजबूत योजना आखणे आणि अंमलात आणणे शक्य झाले आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

(नक्की वाचा-  Political News : कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; सतेज पाटलांचे खंदे समर्थक शिवसेनेच्या वाटेवर?)

"आमची लढाई दहशतवाद्यांविरोधात होती, म्हणून आम्ही 7 मे रोजी फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला होता मात्र दुर्दैव हे आहे की पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांची साथ दिली. त्यामुळे यात जे काही नुकसान झाले त्याला तेच जबाबदार आहे. एअर डिफेन्स देशासाठी मजबूत भिंतीसारखी उभी होती, तिला भेदणे पाकिस्तानला शक्य झाले नाही."

पाकिस्तान्यांनी भारताची एअर डिफेन्स यंत्रणा पार जरी केली असती तरी त्यांना लक्ष्यावर हल्ला करणं शक्यच नव्हतं. जी दुर्दशा पाकिस्तानी हवाई तळांची आपण पाहिली. आपली एअरफिल्ड ही कार्यरत आहे. पाकिस्तानी ड्रोनचा हल्ला देखील हवाई सुरक्षा यंत्रणांनी नाकाम ठरवला. बीएसएफच्या जवानांनी आमच्या अभियानात सामील झाले होते आणि त्यांनी बहादुरीने आम्हाला साथ दिली. "हौसले बुलंद हो तो मंजिलें भी कदम चुमती हैं."

(नक्की वाचा: Political news: 'वादा पूर्ण करायचा नव्हता तर केलाच कशाला', सरकार विरोधात जानकर मैदानात)

लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरची कृती आपल्याला एका संदर्भात समजून घेण्याची गरज आहे. आता नागरिक आणि पर्यटकांना लक्ष्य केले जात आहे. पहलगाम पर्यंत या पापाचा प्याला भरला होता. आम्ही नियंत्रण रेषा ओलांडल्याशिवाय ही संपूर्ण कारवाई केली, त्यामुळे शत्रू काय करेल याची आम्हाला पूर्ण कल्पना होती, त्यामुळे आमचे हवाई संरक्षण पूर्णपणे सज्ज होते.

(नक्की वाचा-  "वडिलांच्या हौतात्म्याचा बदला घेईन", शहीद वडिलांना निरोप देताना 11 वर्षांच्या मुलीचे उद्गार)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com