
24 वर्षीय कोपल अग्रवालने आपला वेट लॉस प्रवास इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर तो जबरदस्त व्हायरल झाला आहे. कोपलचे वजन 101 किलो होते. त्यानंतर तिने वजन कमी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तिने काय खाल्ले हे तुम्हाला माहीत आहे का? घरगुती पौष्टिक अन्न आणि दररोज व्यायाम याच्या मदतीने तिने चक्क 39 किलो वजन कमी केले. आता तिचे वजन 62 किलो झाले आहे. कोपल ही इंग्लंडमध्ये शिकत आहे. वजन कमी झाल्याने ती खूश आहे. शिवाय ती आता तिच्या आवडीचे कपडे ही घालू शकते, असं तिने सांगितलं. वजन कमी झाल्यामुळे केवळ तिचे शारीरिक आरोग्यच सुधारले नाही, तर तिचे मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वासही वाढला आहे. जर तुम्हीही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर कोपलने सांगितलेला डाएट प्लॅन तुम्हाला मदत करू शकतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वेट लॉससाठी डाएट प्लॅन
कोपलने एक डाएट प्लॅन देखील शेअर केला आहे. त्यात तिने वजन कमी करण्यासाठी तीन वेगवेगळ्या दिवसांत काय खाते हे सांगितले आहे. याचा फायदा वजन संतूलीत ठेवण्यात ही होतो.
सकाळचा नाश्ता
- एका पोळीसोबत 5 अंड्यांचा पांढरा भाग
- 2 स्लाइस पनीरसोबत 1 वाटी पोहे
- फळांसोबत उच्च प्रोटीन असलेले दही
दुपारचा नाश्ता
- कलिंगड आणि स्ट्रॉबेरी
- ब्लॅक कॉफी
- नारळ पाणी
दुपारचे जेवण
- हिरव्या भाज्यांसोबत 100 ग्रॅम चिकन
- दह्यासोबत खिचडी
- हिरव्या भाज्यांसोबत पनीर भुर्जी
संध्याकाळी
- ग्रीन टी
रात्रीचे जेवण
- हिरव्या भाज्यांसोबत रोस्टेड पनीर
- सॅलडसोबत 100 ग्रॅम चिकन
- अंड्याची भुर्जी
ट्रेंडिंग बातमी - पाकिस्तानच्या गुप्तहेरांचे धक्कादायक जबाब, 'असे' अडकले दानिशच्या जाळ्यात
एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये, कोपलने सांगितले की तिने या डायटच्या मदतीने 6 महिन्यांत 32 किलो वजन कमी केले. लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे या गोष्टी ही कराव्यात. मेडिटेशन ही तितकेच गरजेचे आहे. दररोज किमान तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. दिवसाची सुरूवात गरम पाणी पिऊन करावी असं ती सांगते. सक्रिय जीवनशैली राखणे आणि दररोज किमान 10,000 पावले चालणे. गोड आणि जंक फूड पूर्णपणे सोडून देणे. केवळ घरगुती अन्न खाणे. हे केल्यास वजन नक्कीच कमी होते असा तिचा दावा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world