जाहिरात
2 hours ago

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. पंतप्रधानांनी राज्य सरकारना याबाबत पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान मोठ्या संख्येने भारतात असलेले पाकिस्तानी नागरिक वाघा बॉर्डरवर पाहायला मिळत आहे. 

पालघर जिल्ह्यात डहाणू आणि तलासरी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.4 नोंदविण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील चारोटी परिसरात होता. भूकंपाच्या धाक्याने चारोटी, बोर्डी, दापचरी आणि तलासरी परिसरात जमिनीला सौम्य हादरे जाणवले. भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणतीही जीवितहानी नाही.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्ता दळवी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्ता दळवी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का समजला जातोय. दळवी हे एक काळी मातोश्रीच्या अगदी जवळचे समजले जात होते. त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले आहेत. 

LIVE Updates: पाकिस्तानचा झेंडा जाळून पहलगाम हल्ल्याचा निषेध

काश्मीर मधील पेहलगाव येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत वेंगुर्ल्यातील शिरोडा येथे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या. अतिरेक्यांना पोसणाऱ्या आणि त्यांना हे कृत्य करायला लावणाऱ्या पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त सरकारने करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Nashik Crime: नाशिकच्या सिडको परिसरात 17 वर्षीय युवकाची हत्या

नाशिकच्या सिडकोतील कामटवाडे परिसरात 17 वर्षीय युवकाचा डोक्यात दगड टाकून  हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली... 

भर दिवसा एका विधी संघर्षीत मुलाची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.... 

हा 17 वर्षीय मुलगा सिडकोतील धन्वंतरी कॉलेज या ठिकाणाहून जात असताना मागून 3 ते 4 तरुणांनी  येऊन या मुलाच्या डोक्यात दगड, फरशी टाकून खुनी हल्ला केला ,यामुळे युवकाचा जागीच मृत्यू झाला.

Kolhapur News: कोल्हापूर शहरात 4 दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

ऐन उन्हाळ्यात कोल्हापुरातील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होतोय. अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने काही भागातील महिलांनी आज रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. काळम्मावाडी योजनेवरील व्हॉल्व्ह दुरुस्ती व अमृत योजनेंतर्गत आपटेनगर पंपिंग स्टेशनच्या जलकुंभावर क्रॉस कनेक्शनचे काम केले जाणार असल्याने  हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. 

LIVE Update: धक्कादायक! पोटच्या मुलाला अमानुष मारहाण

पोटच्या मुलाला अमानुष मारहाण, जळगाव जिल्ह्यातील कोळगावात राहणाऱ्या सुनील पवार याची मुलाला मारहाण. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने फुटली प्रकरणाला वाचा. मारहाण करणारा बाप विक्षिप्त असल्याची माहिती

LIVE Updates: बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध.. आदित्य ठाकरे

बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे! बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावलीये, महत्वाचे मार्ग बंद केलेत, आता जर दरवाढही केली तर बेस्टवर त्याचा विपरीत परिणाम होईल.  आमची ठाम मागणी आहे, 

इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा,  बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या! बेस्ट वाचवा! - 

LIVE Updates: ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत कागदपत्रे आणि फाईल्स जळाल्या

मुंबईतील ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत काही कागदपत्रे आणि फाईल्स जळून खाक. सगळे दस्तावेज डिजिटल रुपात आणि केंद्रीय रेकॉर्ड प्रणालीत स्टोअर करून ठेवल्याने आणि अभियोग तक्रारींसंदर्भातील कागदपत्रे मूळ रुपात न्यायालाकडे असल्याने कोणत्याही तपासात किंवा खटल्यात अडथळा येणार नाही असे ईडीने सांगितले आहे. 

LIVE Updates: शोएब अख्तर आणि बासित अली यांच्या YouTube चॅनेलवरही भारतात बंदी

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पाकिस्तानमधील टीव्ही  वाहिन्यांवर बंदी घातली असतानाच आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि बासित अली यांच्या YouTube चॅनेलवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे. 

LIVE Updates: मुंबईतील 17 पाकिस्तान्यांना देश सोडण्याचे आदेश

मुंबईतील 17 पाकिस्तान्यांना देश सोडण्याचे आदेश. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतात तात्पुरत्या व्हिसावर आलेल्या पाकिस्तान्यांना तत्काळ देश सोडण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे तात्पुरते व्हिसा रद्द केले आहेत. 

LIVE Updates: सोशल मीडिया, OTTवरील अश्लीलतेवर निर्बंध आणा: सर्वोच्च न्यायालयात याचिका

सोशल मीडिया, OTT वर अश्लीलतेवर केंद्र सरकारने निर्बंध आणावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका. केंद्र सरकारसह Netflix, Amazon,Ullu, ALTT, MUBI, Google, X यांना नोटीस पाठवत उत्तर मागवले.

LIVE Update: ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वाद! रणवीर इलाहाबादियाचे पासपोर्ट परत करण्याचे आदेश

‘इंडियाज गॉट लेटेंट’  या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर वादात अडकलेल्या रणवीर इलाहाबादियाबाबत एक महत्त्वाची अपडेच समोर आली आहे.  रणवीर इलाहाबादियाचे  पासपोर्ट परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

LIVE Updates: महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळांची निर्दोष मुक्तता 

सामाजिक कार्यकर्ता  अंजली दमानियांकडून  भुजबळ यांच्या दोषमुक्तीला देण्यात आलं आव्हान 

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती शिवकुमार डिगे समोर आजची सुनावणी तहकूब 

पुढील सुनावणी 12 जूनला ठेवण्यात आली 

12 जून रोजी पुढील  सुनावणी वेळी कोर्टा कडून  महत्त्वाचा निर्देश देण्याची शक्यता

LIVE Updates: पाकिस्तानमधूून आलेले नागरिक देशाबाहेर जातील: CM देवेंद्र फडणवीस

पाकिस्तानमधून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांचे ट्रॅकिंग सुरु आहे. पाकिस्तानमधून आलेले सर्व नागरिक देशाबाहेर जातील.. असे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

LIVE Updates: भारतात पाकिस्तानच्या युट्यूब चॅनल्सवर बंदी, केंद्राचा मोठा निर्णय

पहलगामधील भ्याड हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कडक मोहीम सुरु केली आहे. आज केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून भारतामध्ये पाकिस्तानमधील युट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे. 

LIVE Update: जम्मू काश्मीर विधानसभेत विशेष अधिवेशन: पहलगाम हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर आज जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

LIVE Updates: बडतर्फ पीएसआय रणजीत कासलेविरोधात चौथा गुन्हा दाखल

अंबाजोगाई शहरातील गुत्तेदाराकडून 10 लाखा रुपये घेतले होते त्यामधील 2.5 लाख परत न केल्याने बडतर्फ पीएसआय रणजीत कासले वर आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

रणजीत कासले वर कोणत्या प्रकारचे गुन्हे किती गुन्हे दाखल...

1) ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

2) निवडणुकीच्या काळात कर्तव्यावर नसतानाही खळबळ जनक दावा केल्याने परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

3) आंबेजोगाई शहरातील एका इसमाची 06 लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल रणजीत कासले वर फसवणुकीचा आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

4) उसने पैसे परत न केल्याने आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा रणजीत कासले विरोधात गुन्हा दाखल...

अशा प्रकारचे एक नवे दोन नव्हे तर तब्बल चार गुन्ह्यांमध्ये आता रणजीत कासले अडकला आहे.

Live Update : माजी मंत्री विश्वजित कदम यांची ज्येष्ठ बहीण भारती महेंद्र लाड यांचं निधन

स्वर्गीय डॉ पतंगराव कदम यांच्या ज्येष्ठ कन्या आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांची ज्येष्ठ बहीण भारती महेंद्र लाड यांचं निधन झालं आहे. कुंडलचे नेते महेंद्र आप्पा लाड याच्या पत्नी भारती महेंद्र लाड याचे दुःखद निधन झालं आहे. पुण्यात भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  आज 10 वाजता कुंडलं येथे  भारती लाड यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

Live Update : इंदापूरच्या मदनवाडीत विहिरीत आढळात 40 वर्षीय पुरुषाचा अनोळखी मृतदेह

पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील मदनवाडीत एका विहिरीमध्ये 40 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. भिगवण आयसीयु हॉस्पिटलच्या पाठीमागे मदनवाडीच्या ओढ्यातील एका विहिरीमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. नेमका हा मृतदेह कोणाचा आहे, या मृत्तदेहासोबत नेमकं काय घडलंय यासंदर्भात पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहेत..

Live Update : उल्हासनगरात ओव्हरलोड ट्रकला भीषण आग

उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील पंजाबी कॉलनी अय्यपा मंदिर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रान्सपोर्ट ट्रकने पेट घेतल्याची घटना रविवारी रात्री घडली. या आगीत ट्रकमधील माल जळून खाक झाला. तर  इमारतीच्या बाल्कनीमध्ये आगीच्या झळा पोहोचल्यानं मोठं नुकसान झालं.

Live Update : अकोल्यातील 22 पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा अल्टिमेटम

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशभरात सुरक्षा वाढवताना महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशभरात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही कारवाई सुरू केली असून, अकोला जिल्ह्यात सध्या वास्तव्यास असलेल्या २२ पाकिस्तानी नागरिकांना आज २८ एप्रिल सोमवार रोजी भारत सोडण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.