दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडलीय. जवळपास दोन तास या बैठकीत चर्चा करण्यात आली. सरकारच्या सर्व भूमिकांना विरोधी पक्षाचं समर्थन असल्याचं यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी सांगितलंय. दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहेत. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. जनरल द्विवेदी श्रीनगर आणि इतर संवेदनशील भागांना भेट देणार आहेत. यावेळी हल्ल्याच्या घटनेचा आढावा घेतला जाणार आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर विठ्ठल मंदिराची सुरक्षा वाढवली
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या सामान, बँग, पर्स यांची कसून तपासणी केली जात आहे. भाविकांसह , कर्मचारी यांना मोबाईल आणि इलेक्ट्रिक वस्तू बंदी करण्यात आली आहे. मंदिरामध्ये येणारे केवळ दोनच दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत. इतर सर्व दरवाजे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले आहेत. एकंदर मंदिराची सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.
Live Update : किनवट नांदेड रोडवर ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
किनवट ते नांदेडला जाणाऱ्या रस्त्यावर दोन ट्रकची आपसात धडक झाली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना 24 एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली आहे. किनवट तालुक्यातील इस्लापूर परिसरात ही घटना घडली आहे. यातील एक ट्रक धडकेनंतर छोट्या पुलावरून खाली पडला आहे, तर दुसरा ट्रक पुलावर कठड्यानं शेजारी थांबला आहे. खाली पडलेल्या ट्रक मधील लोकांना स्थानिक जामकर यांच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी इस्लापूर पोलीस करत आहेत...
Live Update : संशयास्पद दहशतवादी आदिलचे दोन भाऊ अटकेत, चौकशी सुरू
संशयास्पद दहशतवादी आदिलचे दोन भाऊ अटकेत, चौकशी सुरू
Live Update : पहलगाम हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर कुठलाही परिणाम नाही, भाविकांकडून धुळ्यात रजिस्ट्रेशन सुरळीत सुरू
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम सर्वत्र झाल्याचं पाहायला मिळत असून पुढील महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन विविध बँकांमध्ये सुरू झाले असून या रजिस्ट्रेशनसाठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याचा कुठलाही परिणाम गेल्या तीन दिवसांपासून रजिस्ट्रेशनवर झालेला नसून जवळपास 300 हून अधिक भाविकांचे रजिस्ट्रेशन झाल्याची माहिती पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहलगाम मार्गे अमरनाथ यात्रा करणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे...
Live Update : छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवरील जंगलात 40 हून अधिक तासांपासून चकमक
छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवरील जंगलात 40 हून अधिक तासांपासून चकमक, 1 हजार नक्षलवाद्यांना दहा हजार पोलिसांनी घेरलं, 7 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती
Live Update : गृहमंत्री अमित शाह यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
गृहमंत्री अमित शाह यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्यांची पडताळणी करून त्यांना पाकिस्तानात पाठविण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याबाबत अमित शाह राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बातचित करीत आहेत.
Union Home Minister Amit Shah is speaking to all chief ministers on the issue, asking them to identify all Pakistan nationals in their respective states and take steps to ensure their prompt return to Pakistan: Sources pic.twitter.com/7MgHqkmRoe
— ANI (@ANI) April 25, 2025
Live Update : 'आमचा काय दोष', अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांकडून व्यक्त केली खंत
#WATCH | Attari, Punjab: "We are told to leave within 48 hours. How is it possible?... Attari is 900 km from Jodhpur. We were not getting buses. My husband had to bear a loss of Rs 1 lakh for the tickets... We have to reach my husband and children today, anyhow. My passport is… pic.twitter.com/ltKFsjG1QE
— ANI (@ANI) April 25, 2025
Live Update : अर्जुन खोतकर पिता-पूत्रांना जीवे मारण्याची धमकी..
जालन्याचे शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये इन्स्टाग्रामच्या चार वेगवेगळ्या अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. अर्जुन खोतकर आणि त्यांचे पूत्र अभिमन्यू खोतकर यांना अनोळखी व्यक्तींनी ही धमकी दिली आहे. कल्याणी ताई तौर यांच्या इंस्ट्राग्रामवर पेज वरील मॅसेजमध्ये धमकी देण्यात आलीय. त्यानंतर अभिमन्यू खोतकर यांनी तालुका पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी या धमकी प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती ही सामोरं आलीय. तपासानंतर ही धमकी कुणी व का.?दिली हे समोर येणार आहे पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे..
Live Update : अर्जुन खोतकर पिता-पुत्रांना जीवे मारण्याची धमकी
अर्जुन खोतकर पिता-पुत्रांना जीवे मारण्याची धमकी
Live Update : भारतीय शेअर बाजारात जोरदार नफा वसुली
भारतीय शेअर बाजारात जोरदार नफा वसूली
निफ्टी २७५ अंक, तर सेन्सेक्स ८५० अंकांनी गडगडला, खासगी बॅंकींग, आणि नॉन बॅंकिग, रिअल इस्टेट, ऑईल आणि गॅस क्षेत्रात जोरदार विक्री
Live Update : कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा..
कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा..
कुणाल कामरा याला अटकेपासून संरक्षण
मागील सुनावणीत न्यायमूर्तींनी राखून ठेवला होता निकाल
न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने दिला निकाल
Live Update : कामाच्या दर्जात तडजोड नको, पाट्या टाकू नका; अजित पवारांची आमदारांसह अधिकाऱ्यांना तंबी
कामाच्या दर्जात अजिबात तडजोड नको, पाट्या टाकायचं काम करू नका, अजित पवारांची अधिकाऱ्यांना तंबी
यावेळी मीटिंग लवकर घेण्याचं कारणच ते आहे
पाट्या टाकायचे काम करू नका
कामाच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी लवकरच एक एजन्सी नेमणार आहे.
ती एजन्सी जिल्ह्यातील प्रत्येक कामाची पाहणी करणार
अजित पवारांची जिल्ह्यातील आमदारांसह अधिकाऱ्यांना तंबी
Live Update : पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती बंदची हाक
पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती बंदची हाक..
अमरावतीच मुख्य मार्केट सकाळपासूनच बंद..
विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने अमरावती बंदची हाक..
घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत पाळला जाणार एक दिवसीय बंद..
Live Update : शेत जमिनीच्या वादातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मेव्हण्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण, दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सदर शेतजमीनीचा निकाल आपल्या बाजूने लागला असल्याने जाणून बुजून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण ओमासे यांनी दिले आहे.
Live Update : पुण्यात आरोग्य भवनच्या इमारतीचे भूमिपूजन
पुण्यात आरोग्य भवनच्या इमारतीचे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात आरोग्य भवनाचं होणार भूमिपूजन
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नवीन २० रुग्णालयाचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार
Live Update : साताऱ्यातील तरुणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
साताऱ्यातील वाई जांबळी येथे पाकिस्तानचा झेंडा आणि भारत देशाबद्दल अपशब्द मजकूर स्टेटसला ठेवला
शुभम जांबळे या युवकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
आरोपी शुभमच्या मित्रानेच दिली वाई पोलीस ठाण्यात तक्रार
युवकाला वाई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Live Update : भारताकडून मध्यम रेंजच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताकडून मध्यम रेंजच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, भारत-इस्त्रायल बनावटीचं क्षेपणास्त्र, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चाचणीला महत्त्व आलं आहे.
Live Update : लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आज आज जम्मू-काश्मीर दौऱ्यावर
पहलगामच्या हल्ल्यानंतर लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आज आज जम्मू-काश्मीर दौऱ्यावर, हल्ल्यातील घटनास्थळाचा घेणार आढावा
Live Update : अकोल्यात काश्मीर हल्ल्याच्या निषेधार्थ पाक ध्वजाचे दहन
जम्मू काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात निष्पाप हिंदू बांधवांची गोळ्या झाडून हत्या केली. अकोल्यात शिवसेना शिंदे गटाच्या नेतृत्वाने मध्यवर्ती बसस्थानकमधील धिंग्रा चौक येथे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आतंकवादाचे प्रतिकात्मक पुतळ्याचे आणि पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करून निषेध व्यक्त केला.