जाहिरात

MP news: 'पौर्णिमेच्या रात्री गर्भधारणा होऊ देऊ नका' शाळकरी मुलींना DIG मॅडमचा सल्ला, कारण ही सांगितलं?

प्रत्येक महिन्याला आपण विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असतो. 31 वर्षापूर्वी पोलिस सेवेत दाखल होण्या आधी आपण चार वर्ष एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे असं त्यांनी सांगितलं.

MP news:  'पौर्णिमेच्या रात्री गर्भधारणा होऊ देऊ नका' शाळकरी मुलींना DIG मॅडमचा सल्ला, कारण ही सांगितलं?

मुलीं वरील अत्याचाराची प्रकरणं देशभरात वाढत आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षेचे धडे दिले जातात. त्यासाठी व्याख्यानांचे आयोजन केले जाते. त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. मग हे कार्यक्रम शाळा असो की कॉलेज असो तिथे राबवले जातात. त्यातून मुलींना सतर्क केलं जातं. याच उद्देशाने एका व्याख्यानाचं आयोजन शालेय विद्यार्थिंनीसाठी केलं होतं. त्यासाठी एका महिला पोलिस अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी या मुलींना गर्भधारणा कधी होऊ द्यायची नाही पासून ते तेजस्वी मुलं जन्माला यावी यासाठी काय करावे याचेच धडे दिले. त्यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायर होत आहे. त्यामुळे सध्या या पोलिस अधिकारी चर्चेत आहेत. त्या स्वत: अविवाहीत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा प्रकार मध्य प्रदेशातील एका खाजगी झालेत घडला आहे. मध्य प्रदेश पोलिसात उपमहानिरिक्षकपदावर सविता सोहाने या कार्यरत आहेत. त्यांना या शाळेने निमंत्रित केलं होतं. मुलींच्या सुरक्षे विषयी त्या व्याख्यान देणार होत्या. त्यावेळी त्यांनी मुलींना गर्भधारणा कधी होऊ द्यायची नाही याबाबत मार्गदर्शन केलं. त्या व्याख्यानात सांगतात, पौर्णिनेच्या रात्री गर्भधारणा होऊ देऊ नका. या व्याख्यानाला त्यांच्या पुढे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थीनी होत्या. त्या पुढे सांगतात तुम्ही या पृथ्वीवर नवीन पिढी आणणार आहात. त्यासाठी तुम्ही काय कराल? तर त्यासाठी तुम्हाला नियोजन करावं गरजेचं आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवी की पौर्णिमेला गर्भधारणा होऊ देऊ नका. शिवाय सुर्य देवाला जल समर्पित करून नियमित नमस्कार करा. तसे केल्यास तुम्हाला ओजस्वी मुलं होतील असा सल्ला त्या देत आहेत.      ़

ट्रेंडिंग बातमी - India Alliance: इंडिया आघाडीत खरोखर फूट पडली आहे का? पडद्यामागे काय घडतंय?

विशेष म्हणजे त्यांना मुलींच्या सुरक्षे विषयी मार्गदर्शन करायचे होते. पण त्यांनी गर्भधारणा कधी झाली पाहीजे याबाबतच मार्गदर्शन केले. यावर त्यांनी आता स्पष्टीकरणही दिलं आहे. पीटीआयला त्यांनी याबाबत आपली बाजू सांगितली. त्या म्हमतात धर्म ग्रंथ वाचायला त्यांना आवडतं. शिवाय त्या संतांचे प्रवचन ही ऐकतात. व्याख्यान द्यायला त्यांना आवडतं. त्या म्हणाल्या की त्या शाळेत 'मी अभिमन्यू आहे' या कार्यक्रमाला संबोधित करत होती. त्याचा उद्देश महिलांची सुरक्षा आणि त्यांचा सन्मान राखणं हा होता. 

ट्रेंडिंग बातमी - Delhi Election: मोदींच्या मंत्र्याची दिल्ली विधानसभा निवडणुकीत वेगळी चुल, 15 उमेदवार उतरवले रिंगणात

प्रत्येक महिन्याला आपण विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असतो. 31 वर्षापूर्वी पोलिस सेवेत दाखल होण्या आधी आपण चार वर्ष एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे असं त्यांनी सांगितलं. शिवाय आपण त्या शाळेत जे काही बोलले ते आध्यात्मातील असल्याचं त्यांनी सांगितलं. पौर्णिमेची रात्र ही हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. त्यामुळेच पौर्णिमेला गर्भधारणा होऊ देऊ नका हा सल्ला आपण दिला असंही त्या सांगतात. त्याला ही आध्यात्माचा आधार असल्याचं त्या सांगायला विसरल्या नाहीत. मात्र त्यांनी केलेल्या या व्याख्यानाची चर्चा मात्र संपूर्ण मध्य प्रदेशात होत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Gwalior Court : "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध गुन्हा नाही, ग्वाल्हेर विशेष न्यायालयाचा मोठा निर्णय

त्या शाळेत आपण एक तास व्याख्यान दिल्याचं त्या म्हणाल्या. मुलींवर होणारे अत्याचार. ते रोखण्यासाठीच्या उपाय योजना. त्यांच्यात जनजागृती करणं हा या व्याख्यानाचा मुळ उद्देश होता. पण या व्याख्यानाचा काही भागच व्हायरल केला गेला असं त्या म्हणाल्या. शिवाय आपण जे बोलले त्याचा जो संदर्भ होता तो मात्र कुणीच दाखवला नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस नेते दिग्वीजय सिंह यांनी ही त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com