21 days ago

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. याचा फटका जनावरांना देखील बसला. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर, धाराशिव, बीड, जालना, संभाजनगरमधील अतिवृष्टीची करणार पाहणी करणार आहेत. दरम्यान राज्यात पुन्हा मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला असून 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Sep 25, 2025 16:55 (IST)

Nashik LIVE Updates: नाशिक च्या पाथर्डी फाटा परिसरात पुन्हा एका इसमाची हत्या

- नाशिक च्या पाथर्डी फाटा परिसरात पुन्हा एका इसमाची हत्या

- गेल्या 12 तासात दोन हत्याच्या  घटनेने नाशिक हादरले

- दगडाने ठेचून इसमाची हत्या कारण अद्याप अस्पष्ट

- इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल अधिक तपास सुरू

- भर दिवसा एका कॅफेत हत्या झाल्याने एकच खळबळ

Sep 25, 2025 16:39 (IST)

LIVE Update: लालबागचा राजा मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी 50 लाखाची मदत जाहीर

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी मदत...

लालबागचा राजा मंडळाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 लाख रुपये मदत जाहीर...

मंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 50 लाखाचा धनादेश केला जाणार सुपूर्द...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाणार धनादेश...

Sep 25, 2025 15:20 (IST)

LIVE Update: कर्नल पुरोहित यांची भारतीय लष्कर दलात पदोन्नती

कर्नल पुरोहित यांची भारतीय लष्कर दलात पदोन्नती 

लेफ्टनंट कर्नल पुरोहित आता बनले कर्नल

पुरोहित यांची काही दिवसांपूर्वी मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी  न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती

पुरोहित यांच्या विरोधात कुठले ही पुरावे सिद्ध न झाल्याने २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पुरोहित यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती

१७ वर्षानंतर लेफ्टनंट कर्नल वरून आता पुरोहित बनले कर्नल

Sep 25, 2025 13:13 (IST)

LIVE Update: अजित पवारांची राष्ट्रवादी बिहारमध्ये निवडणूक लढवणार

एनसीपी अजित पवार पार्टी बिहार निवडणूक लढवणार 

स्वबळावर लढवणार निवडणूक 

एनडीए सोबत निवडणूक लढणार नाही

राष्ट्रीय महासचिव ब्रीज मोहन श्रीवास्तव यांनी यांची माहिती.

राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचा बिहार मध्ये मोठा जनाधार असल्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय

किशनगंज, सीतामढी, अरारिया, ससाराम, बेगुसराय, पाटना या जागेवर यापूर्वी एनसीपी मजबूत असल्याचा दावा

Advertisement
Sep 25, 2025 11:11 (IST)

Live Update : आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण हवं, आरक्षणाबाबत अजित पवारांचं मोठं विधान

आरक्षणाबाबत अजित पवारांचं मोठं विधान

सुप्रिया सुळेंनंतर अजित पवारांचं मोठं विधान 

आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं - अजित पवार 

ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळावं - अजित पवार 

आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं त्याला आमचं दुमत असण्याचे कारण नाही - अजित पवार

Sep 25, 2025 10:36 (IST)

Live Update : पुण्यातील ससून रुग्णालयात मनोरुग्णाची आत्महत्या, 11 व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं आयुष्य

पुण्यातील ससून रुग्णालयात मनोरुग्णाची आत्महत्या, 11 व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं आयुष्य 

५ सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी ससून रुग्णालयात रुग्णाला केलं होतं दाखल

विजय असं या मनोरुग्णाचं नाव असून याआधी रेल्वे समोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न या मनोरुग्ण रुग्णाने केला होता 

याच कारणासाठी रेल्वे पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी केलं होतं दाखल 

आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर 

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

Advertisement
Sep 25, 2025 10:36 (IST)

Live Update : पुण्यातील ससून रुग्णालयात मनोरुग्णाची आत्महत्या, 11 व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं आयुष्य

पुण्यातील ससून रुग्णालयात मनोरुग्णाची आत्महत्या, 11 व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं आयुष्य 

५ सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी ससून रुग्णालयात रुग्णाला केलं होतं दाखल

विजय असं या मनोरुग्णाचं नाव असून याआधी रेल्वे समोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न या मनोरुग्ण रुग्णाने केला होता 

याच कारणासाठी रेल्वे पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी केलं होतं दाखल 

आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर 

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

Sep 25, 2025 10:30 (IST)

Live Update : अकोल्याच्या पातूर वनपरिक्षेत्राची मोठी कारवाई, दोन चंदन तस्कर रंगेहाथ जेरबंद

अकोला जिल्ह्यातील पातूर वनपरिक्षेत्रात वनविभागाने धडक कारवाई केली आहे. चिंचखेड राखीव वनातील कक्ष क्रमांक 69 मध्ये चंदनाची अवैध तोड करणाऱ्या दोन तस्करांना रंगेहाथ पकडण्यात आले. शेख अफसर शेख शरीफ आणि सैय्यद अली सैय्यद चांद अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून सुमारे 5 किलो 370 ग्रॅम चंदन जप्त करण्यात आले आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. ही कारवाई अकोला वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Advertisement
Sep 25, 2025 09:38 (IST)

Live Update : लातूर निलंगा तालुक्यात रात्रीच्या सुमारास सौम्य भूकंप

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात रात्रीच्या सुमारास 2.4 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप झाला. मौजे हासोरी, बडूर आणि उस्तुरी गावांमध्ये धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र प्रशासनाने तात्काळ तपासणी करून कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नसल्याची स्पष्ट माहिती दिली. लातूर जिल्हा भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात असल्याने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवा पसरवू नयेत आणि केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Sep 25, 2025 09:37 (IST)

Live Update : कोल्हापुरातील गांधीनगर रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा करा, शिवसेना ठाकरे गटाची मागणी

कोल्हापुरातील गांधीनगर याठिकाणच्या रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात याव्या अशी मागणी करवीर शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मोठी व्यापार पेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. त्यामुळे या बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ असते. मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, गोवा, कोकण व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील व्यापारी व ग्राहकांची यामुळे सोय होईल. बाजारपेठेत प्रचंड उलाढाल होईल. बाजारपेठेला उर्जितावस्था येऊ शकते. त्यामुळे सर्व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा या ठिकाणी करावा अशा मागणीचे निवेदन रेल्वे प्रशासनाला देण्यात आलं. यापूर्वी देखील शिवसेनेने आंदोलने, लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन याबाबत मागणी केलेली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने घ्यावं अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.

Sep 25, 2025 09:36 (IST)

Live Update : जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान अमरावती जिल्ह्यात तब्बल 142 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान अमरावती जिल्ह्यात तब्बल 142 शेतकऱ्यांच्या आत्महत्या.

सर्वाधिक 26 आत्महत्या फक्त ऑगस्ट महिन्यात नोंदल्या गेल्या.

दुष्काळ, पाऊस व आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल.

गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात 1249 शेतकरी आत्महत्या प्रकरणे नोंदली.

यंदा 8 महिन्यांतच मागील वर्षांच्या तुलनेत आत्महत्यांचे प्रमाण वाढले.

 शेतमालाला भाव न मिळाल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांचे हाल.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा 112 मिलिमीटर पाऊस कमी.

Sep 25, 2025 09:22 (IST)

Live Update : भुसावळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान

 भुसावळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. शेतीकडे वळलेल्या उच्चशिक्षित युवा शेतकरी अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे त्रस्त 

येवल्यात पूर्व भागात पावसाचा हाहाकार... कांदा पिकात पाणी साचल्याने स्वप्न भंगले. अंगुलगाव येथे महिला शेतकऱ्याला आश्रु अनावर...

पूरग्रस्तांच्या मदतीला विठोबा.. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरा कडून पूरग्रस्तांना फूड पॅकेट , आणि प्रसादाचे बुंदी लाडू वाटप.