जाहिरात

Kashmir Pahalgam Terrorist Attack : काश्मीरात अडकलेले पर्यटक विशेष विमानाने मुंबईला परतणार; ही आहे नावांची यादी!

काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Kashmir Pahalgam Terrorist Attack : काश्मीरात अडकलेले पर्यटक विशेष विमानाने मुंबईला परतणार; ही आहे नावांची यादी!

Kashmir Pahalgam Terrorist Attack : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात 28 जणांचा हकनाक बळी केला. महाराष्ट्रातील सहा जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेली अनेक कुटुंबावर मोठा आघात आहे. पतीवर पत्नीसमोर गोळ्या घालण्यात आला. हे दु:ख न संपणारं आहे. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेल्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ते आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही पर्यटक अनेक ठिकाणी अडकलेही आहेत. पर्यटकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्रातील अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान 83 पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने 100, असे महाराष्ट्रातील एकूण 183 पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.