कर्नाटकच्या शिवमोगामध्ये एक जबरदस्त अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका टेम्पो ट्रॅव्हलरने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार घडक दिली. त्यात 13 जण जागी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा अपघात पुणे - बंगळूरू महामार्गावर झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे त्यातील लोक हे मयम्मा देवस्थानाचे दर्शन घेवून परतीचा प्रवास करत होते. हे सर्व जण येमेहट्टी गावचे असल्याची माहितीही पुढे येत आहे. पोलिस या संपुर्ण प्रकरणाकडे लक्ष देवून आहेत.
ट्रेंडिंग बातमी - विकेंडचा प्लान करताय? कुठे असेल मुसळधार पाऊस, Rain Alert वाचा अन् ठरवा!
हा अपघात हावेरी जिल्ह्यातील बडागी तालुक्यातील गुंडेनहल्ली क्रॉसजवळ झाला आहे. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला आहे. अपघातानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढले. जे जखमी होते त्यांना तातडीने रूग्णालयात हलवले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world