'तरुण भारत' वृत्तपत्रातील दोन कर्मचाऱ्यांचा भरधावर कारच्या घडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरु महामार्ग वाईजवळील जोशीविहिर येथे हा दुर्घटना घडली आहे. मंदार कोल्हटकर (वय ४५ वर्ष) आणि धीरज पाटील ( वय ३८ वर्ष) अशी मृतांचा नावे आहे. तरुण भारतच्या सातारा कार्यालयातील वितरण विभागात दोघेही कार्यरत होते.
मंदार आणि धीरत दोघेही दुचाकीवरुन जात असताना मागच्या बाजूने आलेल्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.
जळगावात केमिकल कंपनीला आग, तीघांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी
तरूण भारतमधील मंदार कोल्हटकर व धीरज पाटील काळाच्या पडद्याआड
— sujeet ambekar (@SujeetAmbekar) April 19, 2024
पुणे ते बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर जोशीविहिर (ता. वाई) येथे झालेल्या भीषण अपघातात मंदार कोल्हटकर (वय ४५, रा. कोल्हटकर आळी, सातारा) व धीरज पाटील (वय ३८, रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) हे जागीच ठार झाले. pic.twitter.com/NNjWRCv29K
सीसीटीव्हीच्या दृष्यांमध्ये दिसत आहे, मंदार आणि धीरज दुचाकीवरुन साताऱ्याच्या दिशेने जात आहेत. त्याचवेळी मागच्या दिशेने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, दोघेही अक्षरश: हवेत उडाले. त्यांच्या बाईकसह दोघेही दूरवर फेकले गेले. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, कार विजय शहा नावाच्या व्यक्तीची आहे. अपघाताची माहिती मिळताच सातारा सिव्हिल रुग्णालय परिसरात दोघांच्याही नातेवाईक, मित्रपरिवार यांनी गर्दी केली होती.
राज्यात उकाडा वाढला... 82 जणांना उष्माघात !
मंदार कोल्हटकर यांचे साताऱ्यातील नाट्य क्षेत्रात योगदान होते. त्यामुळे साताऱ्यातील तरुण भारत, नाट्यकर्मी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी रात्रीच जिल्हा रुग्णालयात जात दोन्ही परिवारांची भेट त्यांना धीर दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world