- भारतीय हवामान विभागाने जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे
- यंदाच्या मान्सूनमध्ये देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या पावसाची शक्यता 90 % आहे, प्लस-मायनस 4 % त्रुटी सह
- सुपर अल-निनोच्या प्रभावामुळे मध्य भारत,दक्षिण द्वीपकल्पीय भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असण्याचा अंदाज
Monsoon 2026 Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. जून ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारी (29 मे)पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी हवामान विभागाने 13 एप्रिल रोजी मान्सूनबाबत पहिला अंदाज जाहीर केला होता. दुसऱ्या अंदाजात आयएमडीने लॉंग रेंज रेन फॉल (दीर्घकालीन पाऊस) 90 टक्के होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्येही 4 टक्के अधिक-उणे (प्लस-मायनस) राहू शकते. देशातील वेगवेगळ्या भागांतील मान्सूनच्या अंदाजातही हवामान विभागाने सरासरीपेक्षा कमी पावसाची भविष्यवाणी केली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्यामागे 'सुपर अल-निनो' हे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.
मान्सूनबाबत आयएमडीच्या भविष्यवाणीतील महत्त्वाच्या गोष्टी (Monsoon Arrival Update IMD Forecast)
- दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या हंगामात या वर्षी दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) 90% पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे (मॉडेल त्रुटी प्लस मायनास 4% आहे).
- यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान दक्षिण-पश्चिम मान्सून हंगामात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- ईशान्य भारतात (उत्तर पूर्व भारत) सामान्य पाऊस पडण्याचा अंदाज आहे (94% to 106% of LPA)
- मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
- उत्तर-पश्चिम भारतात दीर्घकालीन सरासरीच्या 92% म्हणजेच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मान्सून कोर झोन (Monsoon Core Zone) - जो मध्य भारतावरील असा भाग आहे जिथे बहुतांश शेती पावसावर अवलंबून असते - तिथेही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
(नक्की वाचा: Heatwave Alert: भारतात 47°C उष्ण तापमानाचे तांडव, महिलांपेक्षा पुरुषांना सर्वाधिक धोका? समोर आलं मुख्य कारण)
आयएमडीचे महासंचालक (DG) डॉ. एम. महापात्र यांनी काय म्हटले?
आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महापात्र यांनी सांगितले की, जून 2026 मध्ये देशातील बहुतांश भागांत मासिक कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य, उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारताच्या काही भागांत कमाल तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागांत मासिक किमान तापमान देखील सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये भारतातील 'या' 12 राज्यांमध्ये उष्माघाताची (हीट वेव्ह) स्थिती (HEAT WAVE FORECAST)
जून महिन्यामध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या अनेक भागांत तसेच महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूच्या काही मोजक्या भागांत सामान्यपेक्षा जास्त उष्माघात (हीट वेव्ह) यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि जूनपर्यंत उष्माघाताची शक्यता हे दर्शवते की, या वर्षी देखील संपूर्ण देशात कडक उन्हाळा असणार आहे.
13 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या अंदाजातही वर्तवला होता सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
यापूर्वी 13 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या अंदाजातही IMDने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. तेव्हा IMDने म्हटले होते की, भारतात या काळात 80 सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशातील हंगामी पावसाची (1971 ते 2020 पर्यंत) दीर्घकालीन सरासरी (LPA) 87 सेंटीमीटर राहिली आहे.
(नक्की वाचा : Nautapa 2026: सतर्क राहा! नवतपामध्ये चुकूनही करू नका या 4 गोष्टी, नाहीतर थेट हॉस्पिटलमध्ये व्हावे लागेल भरती)
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. महापात्र म्हणाले होते की, "संख्यात्मक दृष्ट्या संपूर्ण देशात हंगामी पाऊस एलपीएच्या 92 टक्क्यांपर्यंत होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 5 टक्के घट किंवा वाढ होऊ शकते."
IMD Monsoon Forcast 13 April by prabhanshuranjan.prabhu
अल-निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस
सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे एक कारण अल-निनोची परिस्थिती निर्माण होणे हे असू शकते, ज्यामुळे देशात कमी पाऊस पडतो. IMDनुसार, हवामान मॉडेल्स असे संकेत देतात की जून महिन्याच्या सुमारास अल-निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील कमकुवत ला-निनाची परिस्थिती हळूहळू संपत असून ती सामान्य (तटस्थ) हवामान परिस्थितीत बदलत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world