
Shocking Crime In Metro Train : रेल्वे ट्रेनमधून प्रवास करताना गर्दीचा फायदा घेत काही नराधम महिलांसोबत छेडछाड करतात. महिलांना नको तिथे स्पर्श करून त्यांचा विनयभंग केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण दिल्ली मेट्रोमध्ये महिलेसोबत भयंकर घटना घडल्याचं एका व्हायरल पोस्टच्या माध्यमातून उघडकीस आलं आहे. मेट्रो प्रवासादरम्यान एका वृद्ध व्यक्तीने अनेकदा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत विनयभंग केल्याचा आरोप या पीडित महिलेनं केला आहे. रेडिटवर पोस्ट शेअर करत पीडित महिलेनं घडलेल्या संतापजनक घटनेचा पर्दाफाश केलाय.
मेट्रो ट्रेनमध्ये त्या महिलेसोबत काय घडलं होतं?
महिलेनं रेडिटवर म्हटलंय, सुभाष प्लेस स्टेशनवर 40-50 वर्षांच्या वृद्ध आला आणि महिलांच्या सीटजवळ माझ्या बाजूला बसला. त्याने त्याच्या खिशातून फोन काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने माझ्या हाताला स्पर्श केला. मला वाटलं हे चुकून घडलं असेल. कारण तो थोडा लठ्ठ होता. काही वेळानंतर त्याने पुन्हा माझ्या हाताला स्पर्श केला आणि हाताचा कोपरा माझ्या खांद्यावर ठेवला. मला विश्वासच बसला नाही की,कोणी एवढी हिंम्मत करू शकतो..तेही मेट्रोसारख्या पब्लिक प्लेसमध्ये..
नक्की वाचा >> Video : पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमबाहेर तुफान राडा! प्रेक्षकांनी केली दगडफेक, PAK vs SA सामन्यात काय घडलं?
महिलेनं त्याला विरोध केला अन् म्हटलं, अंकल माझ्या खांद्यावर हात का ठेवला आहे. त्यावर तो म्हणाला, सॉरी..सॉरी..पण पुन्हा त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. इतकच नाही, तर त्याने एक हात माझ्या कंबरेवरही ठेवला आणि तो म्हणाला सॉरी बेटा, मी थोडा थकलो होतो. वाईट वाटून घेऊ नको. मी त्याला काही बोलण्याआधीच त्याने माझ्या गालाला स्पर्श केला आणि पीतमपुरा स्टेशनवर उतरला.

महिलेनं रेडिटवर म्हटलं, त्यावेळी मी खूब घाबरली होती. मी काय करू,हेच मला कळत नव्हतं. सार्वजनिक ठिकाणी असं काही घडू शकतो, या मी कधीच कल्पना केली नव्हती.मी याबाबत कोणालाही सांगितलं नाही.कदाचित सांगूही शकणार नाही. महिलेनं पुढं म्हटलं की, ही घटना तिला पुन्हा पुन्हा आठवते. काल रात्री मी झोपू शकले नाही.दरम्यान, रेडिटवर महिलेची पोस्ट व्हायरल होताच यूजर्सने प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने म्हटलंय,तुम्ही काही चुकीचं केलं नाही. त्यानेच चुकीचं केलं आहे. असं पुन्हा घडलं तर तक्रार करा.
नक्की वाचा >> KBC च्या हॉटसीटवर घडतंय तरी काय? अमिताभ बच्चन यांच्यासमोरच लिटल विराटनेही केली मोठी चूक, गमावले 1 कोटी रुपये!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world