जाहिरात

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' उलगडणाऱ्या नारीशक्ती! कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग?

Who is Wing Commander Vyomika Singh And Colonel Sofia Qureshi: सशस्त्र दलात सेवा देणाऱ्या त्याच्या कुटुंबातील पहिल्याच सदस्य आहेत. 18 डिसेंबर 2019 रोजी त्यांना भारतीय हवाई दलाच्या उड्डाण शाखेत कायमस्वरूपी  बढती मिळाली.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर' उलगडणाऱ्या नारीशक्ती! कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग?

Operation Sindoor Updates: पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप 26 पर्यटकांच्या मृत्यूचा बदला आज भारतीय सैन्याने घेतला. पहलगामच्या 15 दिवसानंतर भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी हल्ले उध्वस्त केले. मध्यरात्री 25 मिनिटे चाललेल्या या कारवाईत 60 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याची लष्कराकडून पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. यावेळी  परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हवाई दलातील व्योमिका सिंग त्यांच्यासोबत कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेची माहिती दिली. कोण आहेत व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी? जाणून घ्या..

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी?

कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकारी आहेत. त्या सध्या सिग्नल कॉर्प्समध्ये सेवा देतात. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्या लष्कराच्या प्रशिक्षण सराव 'एक्सरसाइज फोर्स 18' कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत. . सोफिया कुरेशी 1999 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात सामील झाल्या. त्यावेळी त्यांचे फक्त 17 वर्षांचे होते. 

Latest and Breaking News on NDTV

1981 ला गुजरातच्या वडोदरामध्ये सोफिया कुरेशी यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा आणि वडिलही भारतीय सैन्यात होते. सोफिया यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी घेतली आहे.  1999 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाल्या. त्यांनी चेन्नईमध्ये अधिकारी प्रशिक्षण घेतले. 2006 मध्ये कांगोतील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये सैन्य पर्यवेक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सच्या पदक विजेत्या म्हणूनही सोफिया कुरेशी यांचे नाव घेतले जाते. तसेच पंजाब सीमेवरील कारवाईतील सेवेमुळे ऑफिसर कमांडिंग इन चीफकडून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. 

(नक्की वाचा-  Operation Sindoor : पाकिस्तानात 100 किमी आत घुसून बदला! हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली?)

कोण आहेत व्योमिका सिंग?
व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, व्योमिका सिंग यांचे सहावीपासूनच हवाई दलात भरती होण्याचे स्वप्न होते.  'व्योमिका' नावाचा अर्थही 'आकाशात राहणारी' असा होतो. व्योमिका सिंग यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्या नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्ये सामील झाल्या. सशस्त्र दलात सेवा देणाऱ्या त्याच्या कुटुंबातील पहिल्याच सदस्य आहेत. 18 डिसेंबर 2019 रोजी त्यांना भारतीय हवाई दलाच्या उड्डाण शाखेत कायमस्वरूपी  बढती मिळाली.

Latest and Breaking News on NDTV

विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी 2500 पेक्षा जास्त उड्डाण तास पूर्ण केले आहेत. त्यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतासारख्या कठीण प्रदेशात चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टर चालवले आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशात झालेल्या एका मोठ्या मोहिमेसह अनेक बचाव कार्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. इतकेच नाही तर 2021 मध्ये, व्योमिका सिंगने 21,50 फूट उंच माउंट मणिरंगवर त्रि-सेवा महिला गिर्यारोहण मोहिमेत भाग घेतला.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com