जाहिरात

Pahalgam Attack : पहलगामव्यतिरिक्त ही 3 पर्यटनस्थळे होती दहशतवाद्यांना निशाण्यावर; NIA च्या चौकशीत खुलासा

दहशतवाद्यांनी पहलगाम व्यतिरिक्त आरू व्हॅली, अ‍ॅम्यूजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली तीन ठिकाणांची रेकी केली होती. परंतु त्या तिन्ही ठिकाणी कडक सुरक्षा असल्याने दहशतवाद्यांना तिथे हल्ला करणे शक्य नव्हते.

Pahalgam Attack : पहलगामव्यतिरिक्त ही 3 पर्यटनस्थळे होती दहशतवाद्यांना निशाण्यावर; NIA च्या चौकशीत खुलासा
NIA की जांच में हुए कई बड़े खुलासे

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता NIA ने हाती घेतली आहे. एनआयएच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पहलगाम व्यतिरिक्त, दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर आणखी तीन ठिकाणे होती. दहशतवाद्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणांची रेकी केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान एनआयएला असे आढळून आले की घटनेपूर्वी खोऱ्यात तीन सॅटेलाइट फोन वापरले गेले होते.  पकडण्यात आलेल्या ओव्हर ग्राउंड वर्करकडून चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी बैसरन खोर्‍यात उपस्थित होते. दहशतवादी 15 एप्रिलला पहलगाममध्ये दाखल झाले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Latest and Breaking News on NDTV

दहशतवाद्यांनी पहलगाम व्यतिरिक्त आरू व्हॅली, अ‍ॅम्यूजमेंट पार्क आणि बेताब व्हॅली तीन ठिकाणांची रेकी केली होती. परंतु त्या तिन्ही ठिकाणी कडक सुरक्षा असल्याने दहशतवाद्यांना तिथे हल्ला करणे शक्य नव्हते.

(नक्की वाचा- India vs Pakistan : "भारत येत्या 36 तासांत सैन्य कारवाई करणार", पाकिस्तानची तंतरली)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या तपासात आतापर्यंत सुमारे 20  ओव्हर ग्राउंड वर्कर्सची ओळख पटवण्यात आली आहे. त्यापैकी अनेक ओव्हर ग्राउंड वर्कर्सना अटक करण्यात आली आहे. 4 ओव्हर ग्राउंड वर्कर्सनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना रेकी करण्यात मदत केली होती. खोऱ्यात 3 सॅटेलाइट फोन वापरल्याचे पुरावेही सापडले. तपास यंत्रणांनी त्याच्या दोन्ही फोनचे सिग्नल ट्रेस केले आहेत. २५०० संशयितांपैकी १८६ जण अजूनही ताब्यात असून त्यांची चौकशी सुरु आहे. 

(नक्की वाचा-  Pahalgam Terrorist Attack: पाकिस्तानवर दबाव वाढला! शाहबाज शरीफ यांना थेट US परराष्ट्र मंत्र्यांचा फोन)

Latest and Breaking News on NDTV

जम्मू-काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद

तपास यंत्रणांनी चौकशी करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर सरकारने खोऱ्यातील 48 पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद केली आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने ही कारवाई केली आहे. काश्मीर खोऱ्यात एकूण 87 पर्यटन स्थळे आहेत. यापैकी 48 बंद करण्यात आली आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: