
Pahalgam Terrorist Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तान आता सर्व बाजूंनी घेरलेला दिसत आहे. या दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरीफ आणि रुबियो यांच्या संभाषणादरम्यान, रुबियो यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना या अमानुष हल्ल्याच्या चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करण्याची सूचना केली आहे. रुबियो यांनी पाकिस्तानला भारतासोबतचा वाढता तणाव कमी करण्यासाठी, संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी आणि दक्षिण आशियात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी सांगितलं आहे.
(नक्की वाचा- India vs Pakistan : "भारत येत्या 36 तासांत सैन्य कारवाई करणार", पाकिस्तानची तंतरली)
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी देखील चर्चा केली. पहलगाम येथील भयानक दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल परराष्ट्र सचिवांनी शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्ध भारताला सहकार्य करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
( नक्की वाचा : ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू )
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिका दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेत भारतासोबत उभा आहे. पाकिस्तानकडून युद्धाच्या धमक्यांदरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेने स्पष्टपणे सूचित केले होते की ते दहशतवाद्यांना शोधण्यासाठी आणि मारण्यासाठी कोणत्याही कारवाईत भारताला पाठिंबा देतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या बुधवारी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. या भयानक हल्ल्यातील दोषींना शिक्षा देण्यासाठी अमेरिका भारतासोबत आहे, असे त्यांनी म्हटले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world