जाहिरात
2 hours ago

जम्मू काश्मीरमध्ये पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. त्यात पुण्यातील दोन जणांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या दोघांचे मृतदेह आज पहाटे पुणे विमानतळावर उतरवण्यात आले. दोघांच्याही घरी अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे. संतोष जगदाळे हे कर्वेनगर परिसरात राहत होते. त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी जमा झालेली आहे. थोड्याच वेळात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे दोघांच्याही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Live Update : जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ धुळ्यात समाज बांधवांकडून करण्यात आला मोर्चा

मुंबईतील विलेपार्ले येथील दिगंबर जैन समाजाचे मंदिर व जिनमूर्तीची मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुलडोझर चालवून मंदिर जमीनदोस्त करत जिनमूर्ती व जिनशास्त्राची अवहेलना केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जैन समाजामध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र बघायला मिळत आहे. आज धुळे शहरातील जैन मंदिरापासून निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला या मोर्चामध्ये हजारो समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

Live Update : नवी मुंबईत युवासेना आणि महिला आघाडी तर्फे पाकिस्तानचा झेंडा फाडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना युवासेना आणि शिवसेना महिला आघाडी तर्फे आज वाशीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी युफासेनेतर्फे पाकिस्तानचा झेंडा फाडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

Pahalgam Terrorist Attack Live Update : भारताने पाकिस्तानचं 'X' हँडल केलं ब्लॉक

Pahalgam Terrorist Attack Live Update : भारताने पाकिस्तानचं 'X' हँडल केलं ब्लॉक 

Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी 

बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार

वाल्मीक कराडने मी निर्दोष असल्याच्या केलेल्या दाव्यावर आज कोर्ट काय निर्णय घेणार?

विष्णू चाटेच्या अर्जावरही युक्तिवाद होणाची शक्यता 

विष्णू चाटेने लातूरच्या जेलवरून बीडमध्ये आणला जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष

Live Update : धुळ्यातील दोन तृतीयपंथी जम्मू कश्मीरमध्ये अडकले

किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर - उपाध्यक्ष पार्वती जोगीसह पाच जण पहलगामपासून 50 किलोमीटरवर अडकले आहेत. 

Live Update : काश्मीर पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 जण सुखरुप

काश्मीर पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात, असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे. 

Live Update : पहलगाममध्ये पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू, शरद पवार जगदाळेंच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्काराला

पहलगाममध्ये पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू, शरद पवार जगदाळेंच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्काराला

Live Update : रावेरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे जम्मू कश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून हा निषेध करण्यात आला. तसेच याप्रसंगी या घटनेतील निरपरात मृत्युमुखी पडलेल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

Live Update : जम्मू काश्मीरमध्ये हत्या करण्यात आलेल्या मृतांना मेणबत्ती लावून वाहिली श्रद्धांजली

जळगाव येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आकाशवाणी चौक येथे पक्ष कार्यालया बाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण केली.