
सीएलएसए (CLSA) या ब्रोकरेज फर्मने, पेट्रोल तसेच डिझेलचे दर 5 ऑक्टोबरनंतर कमी होण्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्च 2024 मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. इंधनाच्या दरांमध्ये कपातीचे संकेत केंद्रीय सचिव पंकज जैन यांच्या विधानामुळे मिळत असल्याचे सांगितले जात आहे. जैन यांनी गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा सल्ला दिला होता. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी इंधनाचे दर कमी केले जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये या निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सीएलएसए चे म्हणणे आहे की महाराष्ट्रातील निवडणुकांपूर्वी भाजप नेतृत्व इंधनाचे दर कमी करण्याबाबत विचार करू शकते. केंद्र सरकारने पेट्रोलर 19.8 रुपये आणि डिझेलवर 15.8 रुपये उत्पादन शुल्क लावले आहेत. 2021 ला उत्पादन शुल्क सर्वाधिक होतं त्या तुलनेत सध्याचे शुल्क हे अनुक्रमे 40 आणि 50 टक्क्यांनी कमी आहे. केंद्र सरकारतर्फे भारतातील इंधनावर उत्पादन किंवा विक्रीवर उत्पादन शुल्क लावले जाते.
नक्की वाचा: 99 लाख वेटिंग, 10 लाख तिकीट! काय आहे Coldplay ज्यासाठी भारतीय फॅन्स करतायत पाण्यासारखा पैसा खर्च
केंद्र सरकार एकीकडे उत्पादन शुल्क वाढवण्याचा आणि दुसरीकडे इंधनाचे दर कमी करण्याचा विचार करत आहे. उत्पादन शुल्क वाढवल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीत अधिकचा महसूल जमा होईल आणि इंधनाचे दर कमी केल्याने ते स्वस्तही होईल. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क 1 रुपयाने वाढवल्यास डिझेल आणि पेट्रोलच्या विक्रीतून सरकारला अनुक्रमे 16500 कोटी रुपये आणि 5600 कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती, जी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या तेल कंपन्यांसाठी फायदेशीर ठरली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world