अमजद खान, प्रतिनिधी
Kalyan Shocking News : कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. येथे सुरु असलेल्या 'जॉयस्टीक जंगल'या गेम झोनवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गेम झोन चालविणाऱ्या तिघांना अटक केली आहे. पृथ्वीराज चवान,श्रीराम चवान,अमित सोनावणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रिपोर्टनुसार,पोलिसांना गेम झोनमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या.अल्पवयीन शाळकरी विद्यार्थी या गेम झोनमध्ये जायचे. यामध्ये मुला-मुलींचा समावेश होता.हे विद्यार्थी शाळा आणि ट्यूशनच्या लेक्चरला अनुपस्थित राहून या गेम झोनमध्ये जात असल्याची माहिती समोर आली. तसच हे गेम झोन बेकायदेशीरपणे चालवलं जात होतं.
गेम झोनसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात एका रुममध्ये 'जॉयस्टीक जंगल'या नावाने गेम झोन सुरु असल्याची खबर कोळसेवाडी पोलिसांना मिळाली होती. डिसीपी (DC) अतुल झेंडे यांच्या आदेशानंतर कोळसेवाडी पोलिसांनी या गेम झोनवर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना या गेम झोनमध्ये बेकायदेशीर गोष्टी सुरु असल्याचं निदर्शनास आलं. कोणत्याही प्रकारचनी परवानगी न घेता हे गेम झोन सुरु करण्यात आलं होतं.
नक्की वाचा >> पुण्यात चाललंय तरी काय? 'या' उद्योगपतीला 3 कोटींचा गंडा, दुबई ते टांझानियाचं कनेक्शन आलं समोर!
मुलं-मुली शाळेला दांडी मारून गेम झोनमध्ये गेले अन्..
धक्कादायक बाबमध्ये अंधारात 8 अल्पवयीन मुले-मुली या गेमझोनमध्ये गेम खेळत होत्या. या विद्यार्थांनी शाळा आण टूशनला दांडी मारली होती. तसच गेमझोनमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची उपाययोजना नव्हती. त्या गेम झोनमध्ये आगीची घटना घडल्यास तिथे कोणत्याही प्रकारचं अग्नीरोधक यंत्रणा नव्हती. दरम्यान, याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गेम झोन चालविणारे पृथ्वीराज चवान,श्रीराम चवान,अमित सोनावणे या तिघांना अटक केली आहे. कोळसेवाडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
नक्की वाचा >> 'कमला पसंद', 'राजश्री पान मसाला' मालकाच्या सूनेनं जीवन का संपवलं? 12 वाजता पोलिसांना कॉल अन्..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world