काँग्रेस नेता राहुल गांधी यांना संभलला जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. गाजीपूर सीमेवर पोलिसांकडून त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला. राहुल गांधी बराच वेळ गाजीपूर सीमेवर पोलिसांशी बोलत होते. तब्बल दोन तास त्यांच्याशी वादविवाद केल्यानंतर शेवटी त्यांना दिल्लीला परतावं लागलं.
नक्की वाचा - दिल्लीत काँग्रेसचा हात सोडणं केजरीवालांसाठी फायद्याचं आहे का? 4 मुद्द्यांमध्ये समजून घ्या!
राहुल गांधींसोबत असलेल्या काँग्रेस नेत्यांनांही पुढे जाण्यापासून रोखण्यात आलं. यावर प्रियांका गांधी यांनी संताप व्यक्त केला. राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांना राज्यघटनेत अधिकार दिला आहे. त्यामुळे अशा प्रकारे त्यांना रोखता येऊ शकत नाही, असंही ते यावेळी म्हणाल्या.
पुलिस ने हमें संभल जाने से रोक दिया। विपक्ष के नेता होने के नाते यह मेरा अधिकार और कर्तव्य है कि मैं वहां जाऊं। फिर भी मुझे रोका गया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 4, 2024
मैं अकेला जाने को भी तैयार हूं, लेकिन वे इसके लिए भी नहीं माने। यह संविधान के ख़िलाफ़ है।
भाजपा क्यों डरी हुई है - अपनी नाकामियों को छुपाने के… pic.twitter.com/aZ5pDjXtZA
काँग्रेस नेत्यांना केलं हाऊस अरेस्ट...
आज उत्तर प्रदेशच्या जनपद बुलंदशहरात पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना हाऊस अरेस्ट केलं आहे. आज ४ डिसेंबर रोजी राहुल गांधी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसह संभजला जाणार होते. यादरम्यान स्थानिक पोलिसांनी काँग्रेस नगर अध्यक्ष प्रशांत वाल्मिकी यांच्या घराबाहेर पहारा ठेवला आणि त्यांना हाऊस अरेस्ट केलं. काँग्रेस नेत्यांना घराबाहेर निघण्याची परवानगी नसल्याचीही माहिती आहे.
नक्की वाचा - राजस्थानातील अजमेर दर्गा हा शिवमंदिर असल्याचा दावा, कोणत्या पुस्तकामुळे सुरू झाला वाद?
संभलमध्ये काय घडलं?
संभलचं जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. स्थानिक न्यायालयाने मशिदीच्या सर्व्हेक्षणाचा आदेश दिला. यानंतर सर्व्हेक्षणासाठी टीम संभलच्या मशिदीत पोहोचली. यानंतर परिसरात मोठा वाद निर्माण झाला आहे. काहींच्या मते मशीद तोडत असल्याची अफवा पसरल्यानंतर हिंसाचार बळावला. या हिंसक घटनेनंतर संभलमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये शाही जामा मशिदीच्या सर्व्हेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world