जाहिरात
7 days ago

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. काल 13 फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. दहशतवादी विरोधी लढ्यात भारत आणि अमेरिका एकत्र उभे राहू, भारत आणि अमेरिकेची भागीदारी ही लोकशाही आणि त्याची मूल्ये, व्यवस्था सशक्त बनवते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. 

कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणावर चाकू हल्ला

कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. गुरुदेव हॉटेल चौक परिसरात हा धक्कादायक  प्रकार घडला आहे. कट लागण्यावरुन वाद झाला होता. याबाबत जाब विचारल्याने दोन तरुणांनी दर्शन पाटील आणि  राजवीर सिंग यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले. 

Live Updates: राज्यात कृषिमंत्री कक्षाची स्थापना होणार, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री कक्षाच्या धर्तीवर राज्यात कृषिमंत्री कक्षाची स्थापना होणार...

कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांची अमरावतीत मोठी घोषणा...

कृषिमंत्री कक्षात येणाऱ्या सूचना थेट कॅबिनेटमध्ये मांडणार - ॲड.माणिकराव कोकाटे 

शेतकऱ्यांच्या सूचनांची २४ तासात दखल घेणार, त्यासाठी चांगले अधिकाऱ्यांची नेमणूक करणार कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन 

Buldhana Crime: बुलढाणा जिल्ह्यात 14 महिन्यात एसीबीच्या 18 कारवाया! 25 आरोपी जाळ्यात

बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक पदी शितल घोगरे रुजू झाल्यापासून त्यांनी लाचखोर कर्मचाऱ्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत, डिसेंबर 2023 ते आजपर्यंत या 14 महिन्याच्या कालावधीमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार 18 सापळे यशस्वी करण्यात आले आहेत, या कारवाई मध्ये 25 शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, यापैकी सर्वाधिक लाचखोर कर्मचारी हे महसूल आणि नगर प्रशासनात आढळले असल्याचं समोर आल आहे...

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

वाशिमच्या कारंजा शहरातील सावळकर चौकात आज दुपारच्या दरम्यान दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू  तर एक जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी पूर्णपणे चिरडली गेली आहे. ट्रक चालकाचे वेगावर नियंत्रण नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.अधिकचा तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत.

Live Update : नाशिकच्या पांडव लेणी डोंगराला भीषण आग

नाशिकच्या पांडव लेणी डोंगराला भीषण आग

- डोंगरावरील हिरवीगार झाड आगीच्या भक्ष्यस्थानी

- पांडवलेणी डोंगरावर ऐतिहासिक बौद्ध लेणी परिसरही

- पांडवलेणी डोंगर परिसरात असलेल्या जंगलात भीषण आग 

- पांडवलेणी डोंगर परिसरात असलेला जंगलात मोठ्या प्रमाणात प्राणी आणि निसर्ग संपदा 

- आगीमुळे जंगलातील प्राण्यांच्या जीवाला धोका

- याच जंगलात मोर, लांडोर,रानडुक्कर, बिबटे या प्राण्यांच आहे वास्तव्य

- नाशिकचे रोज हजारो ट्रेकर या ठिकाणी जॉगिंग ला जातात..

- या आगीमुळे पांडवलेणी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

Live Update : सर्व्हर डाउन असल्याने कापूस खरेदी थांबली, हजारो शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत

सीसीआयचे सर्व्हर डाऊन असल्याने कापूस खरेदी थांबली आहे. परिणामी हजारो शेतकरी खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आधार प्रमाणिकरण होत नसल्याने खरेदी थांबली आहे. माजलगाव बाजार समिती अंतर्गत सहा शासकीय खरेदी केंद्रावरून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. शासकीय केंद्रावर कापूस विक्री करताना शेतकऱ्यांना कागदपत्रे, सातबारा, आधार कार्ड अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्री डोकेदुखी ठरली आहे

Live Update : दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांमध्ये स्वतंत्र बैठक

दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांमध्ये स्वतंत्र बैठक 

Live Update : मुंबईनंतर कोल्हापूरात जीबीएसचा पहिला मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचा पहिला मृत्यू 

चंदगड तालुक्यातील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू

महिलेवर गेल्या काही दिवसांपासून सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते

मुंबईनंतर कोल्हापूरात जीबीएसचा पहिला मृत्यू

Live Update : कुंभमेळ्यासाठी पुण्यातून धावणार विशेष रेल्वे

कुंभमेळ्यासाठी पुण्यातून धावणार विशेष रेल्वे 

पुण्याहून भाविकांसाठी हुबळी ते वाराणसी दरम्यान विशेष रेल्वे धावणार 

कुंभमेळ्यासाठीची ही विशेष रेल्वे पुणे, सातारा,दौंड, मिरज, सांगली आणि अहमदनगर मार्गे धावणार 

प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हुबळी-वाराणसी विशेष ट्रेन चालवण्यात येणार

17 फेब्रुवारीपासून पुण्यातून कुंभमेळ्यासाठी विशेष गाडी

Live Update : पुण्यात लोहियानगरमधील पार्किंगमध्ये असणाऱ्या गाड्यांना लागली आग

पुण्यात लोहियानगरमधील पार्किंगमध्ये असणाऱ्या गाड्यांना लागली आग

आगीमध्ये अनेर गाड्या जळून खाक 

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

Live Update : पुण्यात मेट्रोचे अडीच लाख रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीला

पुण्यात मेट्रोचे अडीच लाख रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीला गेले असून पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर भागात सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचे २ लाख ६० हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीला गेले आहे. पुणे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना चोरट्यांनी कामगार पुतळा भागातून अडीच लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले. 

Live Update : जर दोषी नाही तर कारवाई नाही, अजित पवार यांची ठाम भूमिका

जर दोषी नाही तर कारवाई नाही, अजित पवार यांची ठाम भूमिका

धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल समवेत बैठकीत काल सूर

काल एनसीपी सर्व नेत्यांची मुंडे समोरच मांडली भूमिका 

काल अजित पवार यांच्या देवगिरी बंगला येथे झालेल्या बैठकीत अनऔपचारिक झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी ठाम मांडली भूमिका

Live Update : पुणे मनपाकडून पीओपीच्या मूर्ती निर्मिती आणि विक्रीवर बंदी

नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पदार्थांपासून बनवलेल्या मूर्तींनाच परवानगी दिली जाईल. पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात किंवा मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये करणे बंधनकारक आहे. 

या नियमांचे उल्लंघन केल्यास पर्यावरण कायद्यानुसार कारवाई केली जाईल. माघी गणेशोत्सवातील पीओपी गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलाशयात विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. येणाऱ्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तीला पूर्णपणे बंदी असणार आहे. मूर्तिकारांनी शासनाकडे पीओपी मूर्तींना पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Live Update : अंबरनाथमध्ये चड्डी गँगकडून बारमध्ये चोरी, 70 हजार रुपये चोरले

अंबरनाथमध्ये चड्डी गँगने एका बारमध्ये चोरी केली आहे. पत्रे फोडून बारमध्ये प्रवेश करत काऊंटरमधील 70 हजार रुपये चोरले. अंबरनाथ पश्चिमेच्या लादीनाका परिसरात राजस पिसाळ यांचा साईसागर बार आहे. या बारमध्ये 6 फेब्रुवारीच्या पहाटे अंगात फक्त चड्डी घातलेले दोन चोर पत्रे फोडून घुसले. त्यांनी बारच्या काऊंटरमधून 70 हजार रुपये चोरून नेले. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या या चड्डी गँगचा शोध घेत आहेत.

Live Update : उल्हासनगरात 12 लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त! ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलची कारवाई!

उल्हासनगर शहरात एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलने अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाखांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याची माहिती ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी दिली आहे. शाफिकुर रेहमान खान आणि  आरिफ खान अशी अटक केलेल्या ड्रग्ज डीलर्सची तस्करांची नावं आहेत. उल्हासनगरात दोन ड्रग्ज डीलर्स एमडी ड्रग्ज घेऊन कॅम्प २ मधील साईबाबा मंदिराजवळ येत असल्याची माहिती ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलचे हवालदार अमोल देसाई यांना खबऱ्या मार्फत मिळाली होती.