3 months ago
मुंबई:

Rain Update : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईसह देशभरात मुसळधार पावसाने (Mumbai Rain) हाहाकार माजवला. मुंबईत तुफान पावसामुळे लोकलसेवा खोळंबली होती. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. मुंबईसह कोकणातही पावसाचं थैमान पाहायला मिळालं. महाराष्ट्रासह इतर राज्यातही पावसामुळे परिस्थिती बिघडली होती. आसाम राज्यात पूरस्थिती कायम असून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या डोंगराळ राज्यांमध्ये तसेच राजस्थानच्या वाळवंटातही अतिवृष्टीचा सामना करावा लागला. आसाममधील पूरस्थिती कायम असून पुरात आतापर्यंत 60 जणांचा जीव गमवावा लागला आहे. 

Jul 09, 2024 15:10 (IST)

मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. काम होत नसल्याच्या रागातून या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील अधिकाऱ्यांकडून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारूनही काम होत नसल्याने हा व्यक्ती संतापला असल्याचं सांगितलं जात आहे. 

Jul 09, 2024 15:09 (IST)

मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. काम होत नसल्याच्या रागातून या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील अधिकाऱ्यांकडून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारूनही काम होत नसल्याने हा व्यक्ती संतापला असल्याचं सांगितलं जात आहे. 

Jul 09, 2024 12:50 (IST)

अधिकारी आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून सभागृहात गदारोळ

सभागृहाचं कामकाज सुरू असताना अधिकारी आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून विधानसभेत गदारोळ झाला होता. भास्कर जाधव, जयंत पाटील यांच्यासह विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. 

Jul 09, 2024 12:47 (IST)

नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी सभागृहात उपस्थित राहायला हवं, भास्कर जाधवांची मागणी

विधिमंडळाच्या गॅलरीत अधिकाऱ्यांनी येऊन बसायला हवेत. महाराष्ट्रातील नागरिकांचे प्रश्न समजून घ्यायला हवेत अशी मागणी भास्कर जाधव यांनी विधान भवनात सभागृहाचं कामकाज सुरू असताना केलं. 

Advertisement
Jul 09, 2024 11:14 (IST)

विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज सुरू

विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज सुरू

Jul 09, 2024 11:11 (IST)

जम्मू-काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं खोटं पसरवलं जातंय - संजय राऊत

प्रधानमंत्री जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते, तेव्हाही जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर हल्ले झाले आणि त्यात जवान शहीद झाले. देशाचे गृहमंत्री अमित शहा या देशाला भ्रमित करत आहेत. जम्मू-काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं खोटं पसरवलं जात आहे. तिथे शांतता नांदते पण 370 कलम हटवल्यापासून जम्मू कश्मीरमध्ये अधिक अस्थिरता आणि अशांतता निर्माण झाली आहे - संजय राऊत 

Advertisement
Jul 09, 2024 11:02 (IST)

महाविकास आघाडीच्या आमदारांकडून पायऱ्यांवर आंदोलन

महाविकास आघाडीच्या आमदारांकडून पायऱ्यांवर आंदोलन, भ्रष्टाचारी आणि क्लिनचिट देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत आहेत. वायकरांना क्लिनचिट दिल्यानंतर विरोधकांनी आंदोलन पुकारलं आहे. विविध प्रकारचे सरकारविरोधी फलक आमदारांच्या हाती दिसत आहे. 

Jul 09, 2024 10:58 (IST)

ठाणे जिल्ह्यात आज किती पाऊस पडला?

ठाणे जिल्ह्यात आज किती पाऊस पडला?

1.ठाणे -  72.6mm

2.कल्याण - 51.6mm

3.भिवंडी - 58.1mm

4.अंबरनाथ - 46.9mm

5.उल्हासनगर-44.4mm

6.मुरबाड - 46.0mm

7.शहापुर - 43.6mm

एकूण पाऊस - 53.8mm

Advertisement
Jul 09, 2024 10:23 (IST)

अजित पवार आज सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाला

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व आमदार आज सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणूक आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दर्शन घेत असल्याची माहिती आहे.

Jul 09, 2024 09:23 (IST)

पुण्यात पावसाचा फटका आता पोलीस भरतीलाही

पुण्यात पावसाचा फटका आता पोलीस भरतीला देखील

संततधार पावसामुळे पुणे विभागाची पोलीस भरती पुढे ढकलली. पुणे ग्रामीण येथील मैदानी चाचणी घेण्यासाठी योग्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पोलीस भरती पुढे ढकलल्याची पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी माहिती दिली. 9 ते 11 जुलै या कालावधीत होणारी पोलीस शिपाई पदाची भरती पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवीन तारीख करण्यात जाहीर करण्यात येणार आहे. 

Jul 09, 2024 09:20 (IST)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये गेल्या 3 दिवसात 10 टक्के पाणीसाठ्यात वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मागील तीन दिवसात जवळपास 10 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात 20.48 टक्के पाणीसाठा 

Jul 09, 2024 08:24 (IST)

हवामान विभागाच्या अलर्टनंतर आजही मुंबई, पुण्यातील शाळा बंद

Jul 09, 2024 08:21 (IST)

मुंबई विद्यापीठातील आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Jul 09, 2024 08:17 (IST)

अमरावती जिल्हात डेंग्यूचे 72 आणि चिकनगुणियाचे 32 रुग्ण

पावसाळा सुरू होताच आजार डोकं वर काढतात. अमरावती जिल्हा रुग्णालयात विविध आजाराचे रुग्ण दाखल झाले. एका बेडवर दोन रुग्ण उपचार घेत आहे. सध्या अमरावती जिल्हात डेंग्यूचे 72 आणि चिकनगुणियाचे 32 रुग्ण आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी झाली आहे..पावसाळ्यात आपल्या घराबाहेर व घरात स्वच्छता बाबत काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले आहे..

Jul 09, 2024 08:15 (IST)

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला

कोल्हापुरात पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं. शहरासह विविध भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. धरण क्षेत्रात रिमझिम सरी होत्या. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत एक फुटाने घट झाली आहे.  तर जिल्ह्यातील पाच बंधारे वाहतुकीसाठी खुले झालेले आहेत. सध्या पावसाचा जोर कमी असला तरी प्रशासन मात्र अलर्ट मोडवर आहे.

Jul 09, 2024 08:14 (IST)

रत्नागिरीला हवामान खात्याचा रेड अलर्ट

रत्नागिरीला हवामान खात्याचा रेड अलर्ट

सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एसटी बस सेवेला फटका बसला असून 405 एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. खासदार नारायण राणे आज राजापूर पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत.