जाहिरात

Balloon Accident : हॉट बलूनची दोरी तुटली अन् हवेत लटकलेल्या व्यक्तीचा मृत्यू, पाहा VIDEO

बलून उडवणारा कर्मचारी अचानक दोरीला लटकला आणि हॉट बलूनसोबत हवेत गेला. त्यानंतर अचानक दोरी तुटली आणि कर्मचारी उंचीवरून जमिनीवर जोरात आपटला.

Balloon Accident : हॉट बलूनची दोरी तुटली अन् हवेत लटकलेल्या व्यक्तीचा मृत्यू, पाहा VIDEO

Rajasthan News: राजस्थानमधील बारनमध्ये हॉट बलूनच्या दोरीला अडकल्यानंतर उंचीवरून पडून एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या 35 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली आहे. ही थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

बारन जिल्ह्याच्या स्थापनेला 35 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तीन दिवसांचा बारन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. गुरुवार हा या उत्सवाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. याच दिवशी हा अपघात झाला. 

दरम्यान हॉट बलून हवेत उडवण्यात येत होता. बलून उडवणारा कर्मचारी अचानक दोरीला लटकला आणि हॉट बलूनसोबत हवेत गेला. त्यानंतर अचानक दोरी तुटली आणि कर्मचारी उंचीवरून जमिनीवर जोरात आपटला. यात  कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती, त्यापैकी एकाने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. 

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

याच्या एक दिवस आधी, म्हणजे बुधवारी, एक ऐतिहासिक आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक जिल्ह्याच्या सांस्कृतिक वारशाचे, सार्वजनिक संघटनेच्या शक्तीचे आणि सामाजिक एकतेचे उदाहरण बनली. नागरिकांचा उत्साह, पारंपारिक पोशाख, लोककला आणि विविध चित्ररथांनी सजलेल्या या मिरवणुकीत जिल्ह्याचा गौरवशाली इतिहास अनोख्या पद्धतीने सादर करण्यात आला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: