लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले. देशभरात सर्वत्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतू मणिपूरमध्ये मतदानाच्या दिवशी गोळीबार, धमक्या, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएमची तोडफोड करण्यात आली होती. ज्यामुळे मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मतदान केंद्रांवर झालेले मतदान अवैध म्हणून घोषित केले आहे. मणिपूर अंतर्गत मतदारसंघातील 36 आणि बाह्य मणिपूर मतदारसंघातील 11 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी काँग्रेसचे मणिपूर युनिटचे अध्यक्ष के. मेघचंद्र यांनी होती. मणिपूरमध्ये पुन्हा नव्याने मतदान होणार आहे.
मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी शनिवारी मणिपूर लोकसभा निवडणुकीच्या 11 मतदान केंद्रांवर 22 एप्रिल रोजी पुन्हा मतदानाची घोषणा केली आहे. 19 एप्रिल रोजी या मतदान केंद्रांवर झालेले मतदान अवैध घोषित करून नव्याने मतदान घेण्यास सांगणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ज्या मतदान केंद्रांमध्ये खुरई मतदारसंघातील मोइरांगकाम्पू साझेब आणि थोंगम लीकाई, गावमधील चार, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील थोंगजूमधील एक, उरीपोकमधील तीन आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कोंथौजम येथे एक मतदान केंद्रे आहेत. गोळीबार, धमक्या, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएमची तोडफोड आणि मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे आरोप जातीय संघर्षाने प्रभावित मणिपूरमधून नोंदवले गेले. मणिपूरच्या अंतर्गत मणिपूर आणि बाह्य मणिपूर या दोन लोकसभा जागांसाठी शुक्रवारी पहिल्या टप्प्यात मतदान झाले आणि 72 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
तत्पूर्वी, शुक्रवारी मणिपूरच्या लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या मतदानादरम्यान, काँग्रेसने निवडणुकीत हेराफेरी आणि बूथ कॅप्चरिंगचा आरोप केला होता आणि 47 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली होती. काँग्रेसचे मणिपूर युनिटचे अध्यक्ष के. मेघचंद्र म्हणाले की, पक्षाने मणिपूरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे आणि 'मणिपूर अंतर्गत' मतदारसंघातील 36 मतदान केंद्रांवर आणि 'बाह्य मणिपूर' मतदारसंघातील 11 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world