देशभरात वाढलेल्या तापमानाने नागरिक हैराण आहेत. उत्तर भारतात तर उन्हाच्या तडाख्याने लोकांना बाहेर पडणेही मुश्कील झालंय. बिहारच्या बेगूसरायमध्ये तळपत्या उन्हामुळे अनेक विद्यार्थिनींना भोवळ आल्याची घटना समोर आली आहे. सर्वांना जवळच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तापमानाचा पारा वाढलेला असताना एवढ्या गर्मीमध्ये शाळा का भरवली, असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. नितीश कुमार सरकारने अपर सचिव केके पाठक यांच्यावर राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत सुधार करण्यासाठी जबाबदारी दिली आहे. मात्र या घटनेनंतर प्रशासनाचं नक्की याकडे लक्ष आहे का? अशी विचारणा नागरिक करत आहेत.
(नक्की वाचा- रेमल चक्रीवादळाचा कहर, आतापर्यंत 46 जणांनी जीव गमावला)
मिळालेल्या माहितीनुसार, मटिहानी येथील शाळेत ही घटना घडली आहे. एकूण 18 विद्यार्थांना उन्हामुळे भोवळ आली. सकाळी शाळा 10 वाजता सुरु झाली. त्यानंतर अचानक मुली एक एक करुन चक्कर येऊन पडू लागल्या. त्यानंतर विद्यार्थिनींना प्रथमोपचार देण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच सर्व विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
(वाचा - सामूहिक हत्याकांडाने देश हादरला! तरुणाने कुटुंबातील 8 जणांची केली हत्या अन् स्वत:ही... )
शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत सिंह यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. शाळेतील वर्गात पंखे देखील लावण्यात आले आहेत. सोबतच जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थीर आहे. सध्या विद्यार्थिंनींना ओआरएस आणि ग्लुकोज देण्यात आलं आहे.