
राजस्थान: राजस्थानमधील धोलपूर जिल्ह्यातील बारी उपविभागातील कुहवानी गावात एकाच कुटुंबातील दोघांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रथम गावातील एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या सासऱ्याचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, कुहवानी गावातील निवृत्त पोस्टल अधीक्षक मुरारी मीना यांच्या 60 वर्षीय पत्नी माया देवी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मृत माया देवी यांचा मुलगा सुरेश मीना दिल्लीत सरकारी शिक्षक म्हणून काम करतो. तो येण्याची सर्वजण वाट पाहत होते. त्यानुसार अंत्यसंस्काराची तयारीही केली जात होती.
मृत माया देवी यांचे 77 वर्षीय सासरे गुलाब सिंग मीणा, जे 'काका' म्हणून प्रसिद्ध होते, ते गावकऱ्यांसोबत त्यांच्या घरी बसले होते. अचानक गुलाब सिंग बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी त्यांना ताबडतोब बारी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलेगुला ब सिंग यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. डॉक्टरांनी त्यांना गंभीर अवस्थेत धोलपूर येथे रेफर केले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून ग्वाल्हेर येथे रेफर करण्यात आले. तिथेच त्यांचाही मृत्यू झाला.
नक्की वाचा - Road Accident : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
एकाचवेळी काका-सासरे आणि सुनेचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर गावात शोककळा पसरली. गुलाब सिंह हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होते. समाजात त्यांचे मानाचे स्थान होते, ते गेल्या काही महिन्यांपासून आध्यात्मिक जीवन जगत होते आणि गावातील जवळच्याच त्यांच्या झोपडीत राहत होते.
त्यांच्या सुनेचे निधन झाल्याची दुःखद बातमी मिळताच ते त्यांच्या घरी आले होते. दुर्दैवाने त्यांचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला. गावात १२ तासांच्या आत एकाच कुटुंबात झालेल्या दोन हृदयद्रावक मृत्यूंमुळे कुटुंबातील सदस्यांसोबतचसंपूर्ण गाव आणि आजूबाजूच्या गावातील लोकांमध्येही दुःखाची लाट पसरली आहे. हृदयविकाराने मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही मृतांवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले.
Beed Crime : बीडमधील पाचवा संतापजनक Video; आता तर क्रौर्याची हद्दच गाठली!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world