Stock Market : काल जगभरातील बाजारात मंदीचं पडसाद; आज आशियातील बाजारात कशी आहे स्थिती?

सोमवारी जगभरातील बाजारात मंदीच्या पडसादाचा परिणाम म्हणून डाऊ जोन्स निर्देशांक 1030 अंकांनी तर नॅसडक 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

जगभरातील बाजारातल्या मंदीचे पडसाद सोमवारी (5 ऑगस्ट) भारतीय मार्केटमध्येही (Stock Market Crash) उमटले. काही तासांंमध्ये काही शेअर बाजारातील कंपन्यांची मार्केट कॅप जवळपास 15 लाख कोटींनी कमी झाली. भारतातच नाहीतर जगभरातील शेअर बाजार आपटल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदीचे संकेत बाजारासाठी पुन्हा एकदा मारक ठरल्याचं दिसत आहे. 

मात्र आज निफ्टी आणि सेन्सेस दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी परतलेली आहे. निफ्टी 250 अंकांनी तर सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारून उघडलेला आहे.  रिलायन्स अदानी हे दोन्ही मोठे समूहांचे शेअर तेजीत असल्याचं दिसून येत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - कसा झाला भारतीय शेअर बाजार 'आत्मनिर्भर'? वाचा बदलत्या ट्रेंडची Untold Story

सोमवारी जगभरातील बाजारात मंदीच्या पडसादाचा परिणाम म्हणून डाऊ जोन्स निर्देशांक 1030 अंकांनी तर नॅसडक 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता. पण आज सकाळी उघडलेले आशियातील बाजार मात्र पडझडीतून काहीशी सावरलेले दिसतात. जपान आणि कोरिया दोन्ही देशांचे शेअर बाजार आज कालच्या तुलनेत अनुक्रमे 10 टक्के आणि 3% वधारले आहेत. पण चीनच्या शेअर बाजारात मात्र अजूनही पडझड सुरुच आहे. शांघायचा निर्देशांक कालच्या तुलनेत फक्त अर्धा टक्का सुधारला आहे. भारतीय बाजारातही आज जपान आणि कोरिया सारखीच वेगवान सुधारणा होतेय का याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय बाजारात काल परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी 10 हजार कोटींची विक्री केली तर त्याच्या बदल्यात भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी साधारण 9000 कोटींची खरेदी त्यामुळे बाजार उसळलेला असला तरी त्यात भारतीय म्युच्युअल फंडांकडून जोरदार खरेदी होत असल्याचे चित्र आहे.

Advertisement