जाहिरात

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला मोठा दिलासा, अटक टाळण्यात यश

Chit Fund Scam,Interim Relief To Shreyas Talpade: न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांसह केंद्राला नोटीस बजावली आहे.

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला मोठा दिलासा, अटक टाळण्यात यश
नवी दिल्ली:

सर्वोच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला अंतरीम आदेश देत अटकेपासून दिलासा दिला. श्रेयसविरोधात विविध राज्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्याच्यावर चिटफंड योजनेतून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सुनावणी करताना अभिनेत्याला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले असून, हरियाणा पोलीस आणि इतरांना या प्रकरणात स्पष्टीकरण मागण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तळपदेसह इतर अभिनेते आणि फर्मच्या ब्रँड ॲम्बेसेडरना एफआयआरमध्ये का समाविष्ट केले, यावर हरियाणा पोलिसांकडून उत्तर मागितले आहे.  

इंदूरमध्येधील 'ह्यूमन वेलफेयर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी'ने 50 लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पलायन केल्याचा आरोप आहे. या सोसायटीने श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ हे दोघे आपले ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचे सांगून चिटफंड योजना सुरू केली होती. या कंपनीवर 6 वर्षांत रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 45 लोकांकडून 9.12 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. संचालकांनी एजंट म्हणून काम करणाऱ्यांना मॅनेजरचे पद देऊन इतरांना योजनेत सामील करून घेतले होते. कोट्यवधी रुपये हडप केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये सोसायटीची कार्यालये अचानक बंद होऊ लागली, त्यानंतर पीडितांनी वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल केले.

( नक्की वाचा: Pushpa 2: श्रेयस तळपदेच्या जीवनात ‘पुष्पा'ची एण्ट्री कशी झाली? )

प्रकरण नेमके काय आहे ?

दरम्यान, न्यायमूर्ती नागरत्ना यांच्या खंडपीठाने कथित फसवणूक प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. सोनीपत जिल्ह्यातील हसनपूर गावातील विपुल नावाच्या व्यक्तीने श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यासह 13 लोकांविरुद्ध मुरथल पोलीस ठाण्यात फसवणूक आणि विश्वासघात प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात 13 लोकांना आरोपी करण्यात आले आहे. त्यात इंदूरचे नरेंद्र नेगी, दुबईत राहणारे समीर अग्रवाल, पंकज अग्रवाल, परिक्षित पारसे, मुंबई निवासी आर.के. शेट्टी, मुख्य ट्रेनर राजेश टागोर, संजय मुदगिल, हरियाणा हेड पप्पू शर्मा, चंदीगड निवासी आकाश श्रीवास्तव, चेस्ट ब्रांच अधिकारी रामकंवार झा, पानिपत निवासी शबाबे हुसैन यांचा समावेश आहे. 

( नक्की वाचा: सुजलेले ओठ, लालबुंद तोंड.. उर्फी जावेदच्या चेहऱ्याची झाली दुर्दशा, पाहा VIDEO )

'बाबूजी' पण अडचणीत

उत्तर प्रदेशातील महोबामध्येही ही चिट फंड सोजना सुरू होती. तिथल्या गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली होती.  फेब्रुवारीमध्ये श्रेयस तळपदे आणि अभिनेता आलोक नाथ यांच्याविरुद्ध गुंतवणूकदारांची 9 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल करण्यात आली होती.  आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्यासह एका क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 5 सदस्यांवर लखनऊ, उत्तर प्रदेश येथील गोमती नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

( नक्की वाचा: 'गब्बर'नंतर 'ठाकूर'बद्दल सचिन पिळगावकरांचा नवीन दावा, ट्रोलर्स चेकाळले )

श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्यासह इतर 11 जणांना हरियाणामधील सोनीपत येथे मल्टी-लेव्हल मार्केटिंग फसवणुकीशी संबंधित अशाच एका प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. हा वाद एका सहकारी संस्थेशी संबंधित होता, ही सहकारी संस्था 6 वर्षांपासून गुंतवणुकीसाठी लोकांना आकर्षित करत होती आणि जास्त परताव्याचे आश्वासन देत होती. आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांनी या संस्थेच्या गुंतवणूक योजनांना प्रोत्साहन दिले होते, ज्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक केली होती असा आरोप करण्यात आला आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com