जाहिरात

School Teacher : शिक्षकांना आता साप, विंचू पकडण्याची नवी ड्यूटी ! सरकारी आदेशानं संतापाची लाट

Government New Order: सरकारी शिक्षकांच्या कामाच्या यादीत आता आणखी एका धोकादायक कामाची भर पडली आहे.

School Teacher : शिक्षकांना आता साप, विंचू पकडण्याची नवी ड्यूटी ! सरकारी आदेशानं संतापाची लाट
Government New Order : या आदेशामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
मुंबई:

Government New Order:  सरकारी शिक्षकांच्या कामाच्या यादीत आता आणखी एका धोकादायक कामाची भर पडली आहे. ज्यानुसार आता शाळेच्या आवारात साप, विंचू आणि इतर विषारी जीवजंतूंपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी थेट शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. या नव्या आणि वादग्रस्त फतव्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.छत्तीसगडमधील बिलासपूर येथील जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयाने एक नवीन आदेश जारी केला आहे,

काय आहे आदेश?

जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी हा निर्देश न्यायालयाच्या सुरक्षा संबंधित आदेश दिला आहे. या आदेशानुसार  अनेक शाळा मोकळ्या मैदानावर, जंगलाजवळ किंवा वस्तीपासून दूर असल्यामुळे तिथे विषारी प्राण्यांचा धोका अधिक असतो. त्यामुळे, शाळेतील सुरक्षा मानके अधिक मजबूत करण्याची गरज आहे. या नवीन आदेशामुळे शिक्षकांना आता शाळा परिसरात साप, विंचू यांसारख्या धोकादायक जीवांवर लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचे काम करावे लागणार आहे, जेणेकरून मुलांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होऊ नये.

हा अव्यवहार्य आदेश शाळांपर्यंत पोहोचताच शिक्षकांनी तीव्र विरोध सुरू केला आहे. अनेक मुख्याध्यापकांनी आणि प्राचार्यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, शिक्षक आधीच अध्यापन, परीक्षा, प्रशासकीय कामे आणि विविध सरकारी योजनांच्या कामामुळे प्रचंड तणावाखाली आहेत. अशा परिस्थितीत ही नवी आणि तर्कहीन जबाबदारी त्यांच्यावर लादणे पूर्णपणे चुकीचे आहे.

( नक्की वाचा : CCTV VIDEO 'बेस्ट पोलीस स्टेशन'चे सत्य! विद्यार्थ्याला किडनॅप करत खोट्या प्रकरणात अडकवले, व्हिडीओनं बिंग फुटले )

या आदेशावर शिक्षक संघटनेने कडक प्रतिक्रिया दिली आहे. संघटनेने प्रश्न उपस्थित केला आहे की, मुलांची सुरक्षा महत्त्वाची आहे, यात शंका नाही, पण शिक्षकांच्या जीवाची किंमत नाही का? साप-विंचू किंवा कोणत्याही विषारी जीवाच्या संपर्कात आल्यास शिक्षकाचा जीव स्वतः धोक्यात येऊ शकतो. अशा वेळी शिक्षकांना सुरक्षा कोण देणार, असा सवाल संघटनेने विचारला आहे.

या समस्येवर शिक्षकांनी सांगितलं की, ग्रामीण आणि निमशहरी भागातील शाळांमध्ये कुत्रे, डुकरे आणि साप येणे सामान्य आहे. यावर उपाय म्हणजे शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या लादणे नाही, तर शाळेच्या आवारात सुरक्षा रक्षक (Security Guards) नेमणे, बाउंड्री वॉल (Boundary Wall) बांधणे, नियमित स्वच्छता राखणे आणि स्थानिक नगरपालिकेची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून जारी झालेल्या या नवीन आदेशामुळे शिक्षकांचे काम केवळ शिकवण्याचे आहे की इतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आहे, असा मोठा वाद पुन्हा एकदा उभा राहिला आहे. या विरोधावर शिक्षण विभाग पुढे काय भूमिका घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com