जाहिरात
Story ProgressBack

देशातील सर्वोत्कृष्ट कोर्ससाठी कठीण परीक्षा, पास झालात तर कोटींचं पॅकेज

डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ, सीए यांसारख्या सर्वोत्तम कोर्सेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रथम कठीण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

Read Time: 2 min
देशातील सर्वोत्कृष्ट कोर्ससाठी कठीण परीक्षा, पास झालात तर कोटींचं पॅकेज
नवी दिल्ली:

बारावीनंतर तरुणांना करिअरचा योग्य मार्ग निवडताना खूप गोंधळाचा सामना करावा लागतो. यासाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा, करिअर समुपदेशक इत्यादींचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला भविष्यात लाखो कोटी रुपयांचे सॅलरी पॅकेज मिळवायचे असेल, तर तुम्हाला भारतातील टॉप कोर्स करून पदवी घ्यावी लागेल.

डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ, सीए यांसारख्या सर्वोत्तम कोर्सेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रथम कठीण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते आणि त्यानंतर या अभ्यासक्रमांसाठी कठोर अभ्यास करावा लागतो. असे काही कोर्सेस आहेत ज्यात तुम्हाला पदवी मिळविण्यासाठी 4-5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो, परंतु त्यानंतर तुमचे भविष्य सुरक्षित होते.

एमबीबीएस
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी  तुम्हाला NEET परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर तुम्हाला देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसची जागा मिळते. MBBS कोर्स हा 5 वर्षांचा आहे, परंतु तुम्हाला तो 6 वर्षांच्या कालावधीत द्यावा लागतो. उच्च शिक्षणासाठी हा देशातील सर्वात कठीण अभ्यासक्रमांपैकी एक असला तरी पदवी मिळाल्यानंतर आयुष्य निश्चित करता येते.

शास्त्रज्ञ
शास्त्रज्ञ होण्यासाठी मन कुशाग्र असण्यासोबतच संशोधनाची आवड असणे अत्यंत आवश्यक आहे. शास्त्रज्ञ होण्यासाठी विज्ञान क्षेत्राचा सविस्तर अभ्यास करावा लागतो. यामध्ये वैज्ञानिक प्रणाली आणि तंत्रे समजून घेणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञाकडे विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील ज्ञानाबरोबरच बौद्धिक कौशल्ये असणे महत्त्वाचे आहे. अभ्यास पूर्ण केल्यानंतर, एखादी व्यक्ती इस्रो, नासा या अंतराळ संस्थामध्ये नोकरी मिळवू शकते.

चार्टर्ड अकाऊटंट..
सीएचा कोर्स करणारे विद्यार्थी आर्थिक घडामोडी आणि लेखा क्षेत्राशी संबंधित अभ्यास करतात. हा कोर्स चार्टर्ड अकाऊटंट इन्स्टिट्यूटद्वारा ठरवला जातो, जो आव्हानात्मक असतो. भारतात सीए होण्यासाठी लेखा, टॅक्सेशन किंवा कर आकारणी आदीशी संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे. कामाच्या अनुभवातून एखादा सीए महिन्याला ६० लाखांपर्यंत कमाई करू शकतो.

इंजिनिअरींग..
बिटेक करायची इच्छा असेल तर एकदाच मेहनत करा आणि जेईई परीक्षा पास करा. जर आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला तर आयुष्य सेट होईल. इंजिनिअरींग कोर्सचा  अभ्यासक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञानाल मुख्य स्थानी धरून ठरवण्यात आला आहे. इंजिनिअरींगचा अभ्यास अवघड आहे. मात्र यातून परदेशात नोकरी मिळण्याची संधी असते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination