देशातील अधिकतर ट्रेन आता विजेच्या तारेने चालतात. विशेषत: प्रवासी ट्रेनबद्दल सांगायचं झालं तर तब्बल 100 टक्के ट्रेन विजेच्या तारेने चालतात. मात्र एका गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं आहे का? संपूर्ण ट्रेन लोखंडाची, इंजिन, ट्रॅक आणि बोगीसह सर्व साहित्य लोखंडापासून तयार करण्यात आलं आहे. विजेने ट्रेन चालवण्यासाठी 25 हजार वोल्टच्या विद्यूत प्रवाहाची आवश्यकता असते.
प्रवासी ट्रेन चालवण्यासाठी 25 हजार वोल्ट विजेची आवश्यकता असले हे तुम्हाला माहिती असेल. आता एवढी उच्च शक्तीची वीज असूनही, आजपर्यंत बोगींमध्ये एकदाही विजेचा झटका लागल्याची घटना घडलेली नाही. तर रेल्वेने अशी कोणती आयडिया लावली, ज्यामुळे ट्रेन पूर्णपणे सुरक्षित आहे.
इंजिनमध्ये शॉक का लागत नाही?
रुळांवर विजेच्या तारा लावलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. या तारांना ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) म्हणतात. या तारांमध्ये सुमारे 25,000 व्होल्टेजचा विद्युतप्रवाह चालतो.
पँटोग्राफचा वापर या वायर्समधून रेल्वे इंजिनमध्ये विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी केला जातो. यामुळे ट्रेन आणि इलेक्ट्रिक वायरचा थेट संपर्क होत नाही. या पँटोग्राफमध्ये इन्सुलेटर बसवलेले असतात, जे रेल्वेच्या इंजिनपर्यंत विद्युतप्रवाह पोहोचण्यापासून रोखतात.
बोगींमध्ये करंट का लागत नाही?
इंजिनचं तर आपण समजू शकतो. मात्र बोगींमध्ये विद्यूतप्रवाह उतरून झटका का लागत नाही? इंजिनमध्ये एक ट्रान्सफॉर्मर लावलेला असतो. हा ट्रान्सफॉर्मर एसी करंटला डीसी करंटमध्ये रुपांतरीत करतो. त्यानंतर हा डीसी करंट ट्रेनच्या बोगीपर्यंत पाठवला जातो. बोगींमध्ये लावलेले पंखे, बल्ब, एलईडी आदी या विद्यूत प्रवाहातून चालतात. याचा अर्थ बोगीपर्यंत वीज पोहोचण्यापूर्वीच ट्रान्सफॉर्मच्या मदतीने डीसी करंटमध्ये बदलला जातो. या कारणामुळे बोगींमध्ये कधीच विजेचा झटका वा करंट लागत नाही.
कुठून होतो विजेचा पुरवठा...
रेल्वेला पॉवर ग्रीडमधून थेट वीज मिळते, त्यामुळे कधीही वीज कपात होत नाही. पॉवर प्लांटमधून ग्रीडचा पुरवठा केला जातो, तेथून ते सबस्टेशनला पाठवलं जातं. सबस्टेशनमधून थेट 132 केव्ही पुरवठा रेल्वेला जातो आणि येथून 25 केव्ही ओएचईला दिला जातो. त्यामुळे रेल्वे स्थानकांजवळ अनेकदा विद्युत उपकेंद्रे दिसतात. थेट वीजपुरवठ्यामुळे येथे ट्रिपिंग होत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world