जाहिरात

मदतीसाठी ते ओरडत राहिले, ट्रकचालक थांबला नाही; 36 सेकंदांचा थरकाप उडवणारा VIDEO

घटनेनंर दोन्ही बाईकस्वारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. 

मदतीसाठी ते ओरडत राहिले, ट्रकचालक थांबला नाही; 36 सेकंदांचा थरकाप उडवणारा VIDEO

ट्रकने बाईकस्वाराला दूरवर फरफटत नेल्याची घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. बाईक ट्रकखाली उडकली होती. बाईकवरील दोघेजण देखील यामध्ये अडकली होती. मात्र तरीरी ट्रकचालकने ट्रक वेगाने सुरुच ठेवला. आग्रा महामार्गावर ही घटना घडली आहे. अवघ्या 36 सेकंदाची ही थरकाप उडवणारी ही क्लिप व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दोन पीडितांपैकी एक झाकीर याने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर सांगितले की, "आम्ही रात्रीचे जेवण करून घरी परतत होतो. एका ट्रकजवळून जात असताना ट्रकने बाईकला धडक दिली. त्यानंतर बाईक घसरून ट्रकखाली अडकली आणि आमचा पायही अडकला. आम्ही खूप ओरडलो, मात्र ट्रकचालक काही थांबला नाही. त्याने आम्हाला ट्रकसह फरफटत नेले." 

(नक्की वाचा- Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेचा दर्जा ढासळला; प्रदूषण रोखण्यासाठी BMC ची नियमावली)

ट्रकचालक थांबला नाही, त्यानंतर मागून येणाऱ्या काही वाहनांनी ट्रकचा पाठलाग केला.  ट्रक चालकालाही हाक मारली. ट्रक चालकाना गाडी थांबवण्याऐवजी वेग आणखी वाढवला. आम्हाला सुमारे 1.5 किमी खेचत नेले. अखेर काही वाहनांनी ओव्हरटेक करून ट्रक थांबवला. यानंतर स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी चालकाला बेदम मारहाण केली.

(नक्की वाचा-  1 जानेवारीपासून Whatsapp 'या' स्‍मार्टफोन्‍सवर चालणार नाही, लिस्टच आली समोर)

घटनेनंर दोन्ही बाईकस्वारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com